BAMS: आयुर्वेदाला प्रचंड डिमांड! ‘या’ कारणांमुळे MBBS नंतर विद्यार्थ्यांची BAMS ला पसंती, 30 टक्क्यांनी जागा वाढल्या

| Updated on: Jun 18, 2022 | 11:03 AM

आयुर्वेदच्या जागा गेल्या चार वर्षात सुमारे 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि त्यापैकी काही काहीच जागा रिक्त आहेत असं प्रवेशाच्या आकडेवारी वरून दिसून आलंय.

BAMS: आयुर्वेदाला प्रचंड डिमांड! या कारणांमुळे MBBS नंतर विद्यार्थ्यांची BAMS ला पसंती, 30 टक्क्यांनी जागा वाढल्या
विद्यार्थ्यांचं ऑनलाइन आंदोलन!
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई : एनईईटी-युजी (NEET-UG) परीक्षा देणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी (MBBS Syllabus) प्रवेश घेण्याची इच्छा असते. पण असं जरी असलं तरी सध्या जी आकडेवारी समोर येतीये त्यात अलिकडच्या वर्षांत बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (BAMS) पदवी क्रमांक 2 च्या स्लॉटवर गेलीये. आयुर्वेदच्या जागा गेल्या चार वर्षात सुमारे 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि त्यापैकी काही काहीच जागा रिक्त आहेत असं प्रवेशाच्या आकडेवारी वरून दिसून आलंय. पारंपरिक औषधांना केंद्राकडून गती मिळत असली तरी काही आयुष अभ्यासक्रमांची मागणी वाढत आहे.

आता बीएएमएसला प्राधान्य

होमिओपॅथीच्या (बीएचएमएस) मागणीतही वाढ झाली असून, रिक्त जागांची संख्या 2019-20 मधील 844 वरून यंदा 60 वर आली आहे. 2019-20 मध्ये राज्यात 4,300 हून अधिक आयुर्वेदाच्या जागा होत्या आणि 2021-22 मध्ये ही संख्या जवळपास 5,600 पर्यंत गेली आहे. वैद्यकीय शिक्षण समुपदेशक मुजफ्फर खान सांगतात की, पूर्वी विद्यार्थी एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी दंतवैद्यकीय (डेंटल) जागांचा पर्याय निवडत असत, परंतु आता ते बीएएमएसला प्राधान्य देत आहेत.

‘या’ कारणांमुळे MBBS नंतर BAMS ला पसंती

“विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यक शास्त्राचा अभ्यास करता करता आयुर्वेदाचाही अभ्यास करता येत असल्याने त्यांचा कल आयुर्वेदाकडे वाढलाय. त्याचबरोबर यात विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच क्लिनिकल एक्सपोजर देखील मिळते. कोविड-19 महामारीच्या काळात आयुष डॉक्टरही आघाडीवर होते. आयुर्वेदिक डॉक्टर ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये नोकरी करू शकतात, जिथे डॉक्टरांची कमतरता आहे,” असे महाराष्ट्राच्या आयुष संचालनालयाचे संचालक आणि आर. ए. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन गोविंद खटी यांनी सांगितले. ते म्हणाले, “लोकही आयुर्वेदाकडे आकर्षित होत आहेत कारण त्यांना हे समजले आहे की तेथे कमीतकमी दुष्परिणाम आहेत आणि रोजच्या आयुष्यातले अनेक आजार आहेत ज्यांना आधुनिक वैद्यकशास्त्रात उपचार नाहीत. विद्यार्थी आयुर्वेदात पीजीचे शिक्षण घेत आहेत, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आधुनिक औषधनिर्माण शास्त्राचा ब्रिज कोर्स

खासगी आयुर्वेद कॉलेजांत मॅनेजमेंटच्या जागा मिळवण्यासाठी पालक अधिक पैसे देण्यास तयार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. ‘गेल्या चार वर्षांपासून राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना मेडिकल कॉलेजांमध्ये आधुनिक औषधनिर्माण शास्त्राचा ब्रिज कोर्स करण्याची परवानगी दिली आहे. कॅन्सरसारख्या विशेष आवश्यक आजारांचा अपवाद वगळता या डॉक्टरांना आजारांवर औषधे पुरवण्याचे प्रशिक्षण दिले जाते,’ असे शिनगारे यांनी सांगितले. एक वर्षाचा ब्रिज कोर्स केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आला होता, परंतु या मागणीमुळे राज्याने काही खासगी महाविद्यालयांमध्येही परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तथापि, आयुष डॉक्टर कायदेशीररित्या आधुनिक वैद्यकशास्त्राचा सराव करू शकतात की नाही यावर वाद सुरू आहे कारण वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यास कडाडून विरोध केला आहे, असेही एका डॉक्टरने सांगितले