JEE Advanced Registration: जेईई मेन्स रिझल्ट 2022 (JEE Mains Result 2022) जाहीर झाला आहे. तसेच जेईई ॲडव्हान्स्ड 2022 ची नोंदणी (JEE Advanced 2022 Registration) सुरू होत आहे. आयआयटी मुंबई 8 ऑगस्ट 2022 रोजी जेईई ॲडव्हान्स्ड फॉर्म jeeadv.ac.in अधिकृत संकेतस्थळावर जारी करत आहे. आयआयटीमध्ये प्रवेशासाठी (IIT Entrance) ही परीक्षा आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्ड 2022 मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन आजपासून ऑनलाइन नोंदणी करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे. या बातमीत जेईई ॲडव्हान्स्ड रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे.
आयआयटी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा 2022 मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला भरमसाठ शुल्क भरावे लागेल. अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क 2800 रुपये आहे. तर महिला, एसटी, एसटी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क 1400 रुपये आहे. ऑनलाइन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही फी भरू शकता. शुल्क भरण्यासाठी 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ मिळेल.
आयआयटी जेईई 2022 आयआयटी मुंबईतर्फे रविवार, 28 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये पेपर 1 ची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत घेतली जाणार आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे 23 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म यशस्वीरित्या सादर केला जाईल, त्यांची प्रवेशपत्रे जाहीर केली जातील. या विद्यार्थ्यांना 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.