Solar Storm : 21.85 लाख KM वेगानं पृथ्वीकडे येतंय विध्वसंक वादळ, कोलकात्यातील वैज्ञानिकांचा अंदाज

| Updated on: Mar 30, 2022 | 8:17 PM

कोलकाता (Kolkata) येथील द सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेसच्या वैज्ञानिकांनी 28 मार्च 2022 ला सूर्यामध्ये भयानक विस्फोट पाहिले आहेत. कोरोनल मास इजेक्शन (Coronal Mass Ejection) स्फोटाद्वारे निर्माण झालेली सौर लहर म्हणजेच विध्वसंक वादळ (Solar Strom) 31 मार्चला पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Solar Storm : 21.85 लाख KM वेगानं पृथ्वीकडे येतंय विध्वसंक वादळ, कोलकात्यातील वैज्ञानिकांचा अंदाज
सौर वादळ
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : कोलकाता (Kolkata) येथील द सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेसच्या वैज्ञानिकांनी 28 मार्च 2022 ला सूर्यामध्ये भयानक विस्फोट पाहिले आहेत. कोरोनल मास इजेक्शन (Coronal Mass Ejection) स्फोटाद्वारे निर्माण झालेली सौर लहर म्हणजेच विध्वसंक वादळ (Solar Strom) 31 मार्चला पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळाचा वेग 21.85 किलोमीटर प्रतितास असू शकतो ,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे एक मध्यम दर्जाचं वादळ असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात 496 ते 607 किलोमीटर प्रतिसेंकद च्या गतीनं पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. द सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस कोलकातानं 28 मार्चला धोकादायक स्पॉट पाहिले आहेत. त्याला त्यांनी AR 12975 आणि AR 12976 हे नाव दिलं आहे.हे दोन्ही स्पॉट अॅक्टिव्ह असून एम आणि एक्स क्षमतेची सौर लहर निर्माण करु शकतात. संस्थेचे प्राध्यापक दिव्येदू नंदी यांनी या लाटांमुळं घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

दिव्येंदू नंदी काय म्हणाले?

प्राध्यापक दिव्येंदू नंदी यांनी जानेवारी महिन्यात देखील अशा घटना घडल्याचं सांगितलं आहे. त्यावेळी सौर वादळामुळं दक्षिण भारत आणि दक्षिण गोलार्धात परिणाम झाला होता. यावेळी देखील भारतीयांनी जादा घाबरण्याची गरज नसल्याचं नंदी यांनी म्हटलं आहे.

जानेवारी महिन्यात आलेलं सौर वादळ एम क्लासचं होतं. त्यामुळं कशा प्रकारचं नुकसान झालं या संदर्भात माहिती मिळालेली नाही.काही देशांमध्ये याची माहिती घेतली जात असून अभ्यास केला जात आहे. ते सौर वादळ सूर्याचं सक्रिय ठिकाण असलेल्या AR 12929 येथून निर्माण झालं होतं. याशिवाय सूर्य आणि पृथ्वी यांच्यात 71 अंशाच्या कोणात स्थिरावलं होतं. सौर वादळाला कोरोनल मास इजेक्शन असं देखील म्हटलं जातं.

जानेवारीमध्येही सौरवादळ

दिव्येंदू नंदी यांनी 20 जानेवारी 2022 ला सौर वादळ 11 वाजता पृथ्वीला धडकलं होतं असं सांगितल. त्यावेळी दक्षिण भारतात त्याचं केंद्र होतं.याशिवा ऑस्ट्रेलिया, दक्षिण पूर्व आशियाच्या भागात ते सक्रीय होतं. सौर वादळाचा परिणाम आपल्या वायूमंडळाच्या वरच्या कक्षेत दिसून येतो. आपलं वायूमंडळ सूर्याकडून येणारी अतिनिल किरणं अडवण्याचं काम करतो. जगात सर्वात भयानक सौर वादळ 1859, 1921 आणि 1989 मध्ये आलं होतं. यामुळं काही देशातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पॉवर ग्रीड देखील फेल झाली होती. 1989 मध्ये उत्तर पूर्व कॅनडामधील हायड्रो पॉवर प्रोजेक्ट फेल झाला होता. गेल्या काही दशकांपासून सौर वादळ आलं नव्हतं.

इतर बातम्या:

Ajmal kasab : अजमल कसाबचा पत्ता भारताला नवाज शरीफ यांनी दिला, पाकिस्तानी मंत्र्याचा खळबळजनक दावा

Amit Shaha In LS: मी असं विधेयक महाराष्ट्रासाठी आणू शकत नाही, केजरीवालांना उत्तर देताना शहांचा तीन राज्यांचा दाखला