NEET UG Counselling वेळापत्रक! महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

| Updated on: Oct 04, 2022 | 8:41 AM

या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार नोंदणी करू शकतात. पुढील फेऱ्या कधी सुरू होतील हे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

NEET UG Counselling वेळापत्रक! महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
NEET UG Counselling
Image Credit source: Social Media
Follow us on

एनईईटी यूजी 2022 समुपदेशन वेळापत्रक जाहीर झालंय. वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) कडून हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. समुपदेशन 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. पुढच्या आठवड्यात समुपदेशनासाठी नोंदणी सुरु होणार आहे. उमेदवार नोंदणीसाठी mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार नोंदणी करू शकतात. नीट यूजी समुपदेशनाची पहिली फेरी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पुढील फेऱ्या कधी सुरू होतील हे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

यावर्षी 17 जुलै रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे नीट यूजी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. एनईईटी परीक्षा 2022 उत्तीर्ण झालेले उमेदवार समुपदेशन प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

नोंदणी सुरू झाल्यानंतर उमेदवारांना टप्प्याटप्प्याने अर्ज कसा करायचा याची माहिती दिली जाईल. नीटचे समुपदेशन चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.

एनईईटी यूजी 2022 समुपदेशन वेळापत्रक थेट लिंक

गेल्या वर्षी स्वीकारलेल्या पॅटर्ननंतर एमसीसी चार फेऱ्यांमध्ये एनईईटी यूजी समुपदेशन करणार आहे. यामध्ये
राउंड 1, राउंड 2, मॉप अप राउंड आणि भटक्या रिक्त (स्ट्रे वैकेसी) जागांचा समावेश आहे.

2022-2023 साठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, ईएसआयसी आणि एएफएमएस संस्थांमधील अखिल भारतीय कोट्याच्या 15 टक्के जागांसाठी नीट यूजी समुपदेशन केले जाईल.

नीट यूजी 2022 समुपदेशन वेळापत्रक महत्वाच्या तारखा

  • निवड भरणे आणि लॉक करणे – 14-18 ऑक्टोबर 2022
  • अंतर्गत उमेदवारांची पडताळणी – 17-18 ऑक्टोबर 2022
  • जागा वाटपाची प्रक्रिया- 19 ते 20 ऑक्टोबर 2022
  • राउंड 1 निकाल सीट अलॉटमेंट– 21 अक्टूबर, 2022
  • रिपोर्टिंग आणि जॉइनिंग- 22 ते 28 ऑक्टोबर 2022
  • दुसऱ्या फेरीला सुरुवात – 2 नोव्हेंबर 2022