Polytechnic Admissions: स्कूल कनेक्ट प्रोग्रामचा फायदा,पॉलिटेक्निक प्रवेशात वाढ! यंदा 97 हजार विद्यार्थी घेणार प्रवेश

| Updated on: Jul 02, 2022 | 7:10 AM

स्कूल कनेक्ट उपक्रमात तंत्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा परिणाम पॉलिटेक्निकच्या प्रवेशावर दिसून येतोय.

Polytechnic Admissions: स्कूल कनेक्ट प्रोग्रामचा फायदा,पॉलिटेक्निक प्रवेशात वाढ! यंदा 97 हजार विद्यार्थी घेणार प्रवेश
NEET PG allotment
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: नुकताच दहावीचा निकाल (SSC Results 2022) लागलाय. निकालानंतर लगबग असते ती पुढच्या कॉलेजच्या प्रवेशाची. सायन्स, कॉमर्स, आर्टस् की डिप्लोमा अशा गोंधळात विद्यार्थी असतात. मधले काही वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशाचं प्रमाण कमी झालं होतं. परंतु आता ते वाढलंय. यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाला (Polytechnic Entrance) विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. पॉलिटेक्निकला दहावीच्या गुणांवर प्रवेश मिळतो. दहावीचा निकाल लागल्यापासून आतापर्यंत तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे तर 67 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशशुल्क भरून आपला अर्ज कन्फर्म केला आहे. प्रवेशाची संख्या वाढलीये ती स्कूल कनेक्ट उपक्रमामुळे वाढली असल्याचं म्हटलं जातंय. स्कूल कनेक्ट उपक्रमात (School Connect Program) तंत्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा परिणाम पॉलिटेक्निकच्या प्रवेशावर दिसून येतोय.

दहा दिवसात 90 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविका प्रवेशाकरिता यंदा स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत राज्यभरातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयाने मार्गदर्शन केले. याचा परिणाम आता प्रवेशावर होत आहे. पहिल्या टप्यात केवळ दहा दिवसात 90 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

  • पदविका तंत्रज्ञानचे (पॉलिटेक्निक) प्रवेश यावर्षी 10 टक्क्यांनी वाढले होते
  • 69 हजार 705 विद्यार्थ्यांनी राज्यभरातील 367 संस्थांत प्रवेश घेतला होता
  • त्याआधी 62 हजार 122 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.
  • यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोरोना काळातही पॉलिटेक्नीक प्रवेश वाढले

राज्यभरातील सर्व विभागातील सहा लाखाहून अधिक दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपर्यंत संचालनालयांने स्कूल कनेक्ट हा उपक्रम पोहोचविला. त्यामुळे अभ्यासक्रमाचे महत्व आणि संस्थांची माहिती दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली आहे. कोरोना काळातही पॉलिटेक्नीकच्या जागांवरील प्रवेश तीन वर्षांत 30 टक्क्यांनी वाढले होते.

हे सुद्धा वाचा

यंदा मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास

शैक्षणिक अभ्यासक्रम शिष्यवृत्ती योजना, प्रवेश प्रक्रिया, रोजगारांच्या उपलब्ध संधी इत्यादी माहिती शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी फेसबुक, ट्विटर आणि इतर डिजीटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलाय. डिजिटल माध्यमांद्वारे संस्था आणि महाविद्यालयांनी तंत्रनिकेतनातील प्रवेशाबाबत जनजागृती व स्कुल कनेक्ट प्रोग्राम राबविला. योग्य नियोजन, योग्य माध्यम आणि चांगली प्रसिद्धी याच जोरावर गतवर्षी झालेल्या प्रवेशापेक्षा यंदा मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास वर्तविण्यात येत आहे.