या 3 शिष्यवृत्तीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता! अर्जाची लिंक खाली!

| Updated on: Oct 01, 2022 | 5:55 PM

वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांपासून ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योग्य शिक्षण पोहचवू शकते.

या 3 शिष्यवृत्तीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता! अर्जाची लिंक खाली!
Scholarship
Image Credit source: Social Media
Follow us on

आजच्या काळात अभ्यास करणं खूप महाग झालंय. शाळा कॉलेजच्या फी, शिक्षणाचे इतर खर्च न परवडणारे असतात. अशा परिस्थितीत शिष्यवृत्ती हे एक माध्यम आहे ज्याद्वारे शिक्षणावरील ओझे कमी केले जाऊ शकते. वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांपासून ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योग्य शिक्षण पोहचवू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी स्कॉलरशिप खूप प्रभावी ठरू शकते.

एखाद्या विद्यार्थ्याला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल, तर शिष्यवृत्तीही त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरते. या माध्यमातून केवळ ट्युशन फी भरता येणार नाही, तर राहण्या-खाण्याचा खर्चही निकाली काढता येतो.

जाणून घेऊयात अशाच काही शिष्यवृत्तींविषयी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होऊ शकते. या सर्व शिष्यवृत्तीसाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज करता येईल.

1. मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट (MICT) स्कॉलरशिप प्रोग्राम: मर्क इंडियाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि बेंगळुरू येथे राहणाऱ्या आणि शिकणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्याचा पाया रचण्यास मदत करणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. www.b4s.in/it/MERCK7 भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

पात्रता : ही शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे 2022 मध्ये किमान 80% गुणांसह 10 वी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि बेंगळुरू मधील असावेत. शिक्षणही याच ठिकाणी घेतलेलं असावं.

विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न दरमहा 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंवा तेवढेच असावे.

शिष्यवृत्तीची रक्कम : या शिष्यवृत्तीअंतर्गत उमेदवाराला पदवीपर्यंत वार्षिक 35 हजार रुपये दिले जातील.

2. लॉरियल इंडिया फॉर यंग वुमन इन सायन्स स्कॉलरशिप 2022: भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात पदवी घेऊ इच्छिणाऱ्या तरुणींना लॉरियल इंडिया शैक्षणिक शिष्यवृत्ती देत आहे.

या शिष्यवृत्तीचा उद्देश तरुणींना विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आर्थिक मदतीसह सक्षम करणे हा आहे.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर आहे. उमेदवार www.b4s.in/it/LIS1 ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पात्रता : शैक्षणिक वर्षात (2021-22) पीसीबी/पीसीएम/पीसीएमपीमध्ये 85% सह इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

शिष्यवृत्तीची रक्कम : निवड झालेल्या उमेदवारांना विज्ञान विषयातील पदवीसाठी त्यांच्या शिक्षण शुल्क व शैक्षणिक खर्चासाठी हप्त्यांमध्ये 2,50,000 रुपयांपर्यंत रक्कम दिली जाईल.

3. HDFC Bank बँक परिवर्तनची ईसीएस शिष्यवृत्ती 2022-23: HDFC Bank बँक इयत्ता पहिली ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवत आहे.

समाजातील वंचित घटकातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ही शिष्यवृत्ती आणण्यात आली आहे.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. उमेदवार www.b4s.in/it/HEC12 भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पात्रता:

  • भारतीय नागरिक असणं गरजेचं.
  • पहिली ते बारावी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट किंवा पदव्युत्तर पर्यंत कोणत्याही वर्गातला विद्यार्थी यासाठी पात्र.
  • अर्जदारांनी त्यांची मागील परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समान असावे.
  • गेल्या तीन वर्षांत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार.

शिष्यवृत्तीची रक्कम : या शिष्यवृत्तीअंतर्गत उमेदवारांना 75 हजार रुपये दिले जातील.