आदिवासी मुलांच्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रोल मॉडेल पद्धतीने शाळा सुरु!

| Updated on: Oct 01, 2021 | 2:01 PM

देशातील व राज्यातील आदिवासी क्षेत्रातील मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून देशात भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्यावतीने 154 रोल मॉडेल पद्धतीने आश्रमशाळा सुरू असून यात शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान देखील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

आदिवासी मुलांच्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रोल मॉडेल पद्धतीने शाळा सुरु!
रोल मॉडेल पद्धतीने शाळा सुरु
Follow us on

धुळे : देशातील व राज्यातील आदिवासी क्षेत्रातील मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून देशात भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्यावतीने 154 रोल मॉडेल पद्धतीने आश्रमशाळा सुरू असून यात शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान देखील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

आदिवासी क्षेत्रातील तळागाळातील वंचित विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने शिक्षकांच्या माध्यमातून विशेष कार्य व उपक्रम राबविले जात आहे. 154 शाळांपैकी धुळे तालुक्यातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ याद्वारे देखील विशेष समिती गठीत करून त्यामध्यमातून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे.

नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती निर्मितीसाठी संशोधन

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे येथे प्राथमिक व माध्यमिक अशी इयत्ता 1 ली ते १० वी पर्यंतची आश्रम शाळा सुरु असून संस्थेने 6 वर्षांपूर्वी तज्ञांची विशेष सामिती स्थापन करुन सर्वत्र चालू असलेल्या पारंपारिक शिक्षणातून भविष्यासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती निर्मितीसाठी संशोधन करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीचे कार्य सुरु केले आहे.

4 वर्षांपासून 90 टक्यांहून अधिक निकाल, 63 % विद्यार्थ्यांचे स्वत:चे व्यवसाय

मुळात शिक्षणाच्या व विकासाच्या प्रचंड दूर असलेल्या अनुसूचित जाती व समाजातील अत्यंत गरीब , शिक्षणापासून वंचित विदयार्थी , विद्यार्थिनीसाठी संस्थेने 7 पॅरामिटर लावून आपले कार्य सुरु केले यासाठी विशेष सुविधा निर्माण करून सर्व स्टाफला विशेष असे ट्रेनिंग देण्यात आले आहे व केलेल्या या मेहनतीद्वारे गेल्या 4 वर्षापासून शाळेचा इयत्ता १० वी चा निकाल हा  90% पेक्षा अधिक लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुढील उच्च शिक्षणाचे प्रमाण हे 92 % पर्यंत पोहचले असून यातील सुमारे 63 % विद्यार्थ्यांनी स्वताचे व्यवसाय सुरु केलेले आहेत तर विद्यार्थी वार्षिक १ ते १० लाखापर्यंत अर्थाजन करीत असून इतरांनाही रोजगार देत आहेत. सुमारे 23 % विद्यार्थी हे खाजगी नोकरी व 7% विद्यार्थी हे शासकीय सेवेत लागले आहेत .

कोरोना काळातही ज्ञानदानाचं कार्य

नाविन्यपूर्ण कामासोबतच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये करोना महामारीत शाळेत प्रथमता ऑनलाईन शिक्षण सुरु केले. तथापि, ग्रामीण भागातील व अत्यंत गोरगरीब अशा ह्या विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाईन शिक्षण हे अत्यंत अडचणीचे व अश्यक्य प्राय दिसू लागल्याने सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याना घरोघरी जाऊन ज्ञानदान केले आहे व शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 1 ऑगस्ट 2021 पासून नियमित आश्रम शाळा  सर्व पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नियमित सुरु केले.

एकाही शिक्षक-विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा नाही

यात प्रथमता संपूर्ण  स्टाफचे लसीकरण करून सर्व विद्यार्थ्यांनी करोना संदर्भात उपाययोजनांचे आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. संपूर्ण इमारत सॅनिटाईज करून विद्यार्थ्यांना सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि करोना संदर्भात सर्व नियमांचे सुयोग्य पद्धतीने पालन करुन राज्यातील ही पहिलीच आश्रम शाळा सुरु असून आजपर्यंत या ठिकाणी एकही विद्यार्थी, स्टाफला कोणत्याही प्रकारची बाधा झालेली नाही.

(Start school with role model method for quality education of tribal children)

हे ही वाचा :

Maharashtra School Reopen : सुरक्षितपणे शाळा कशी सुरु करायची? टास्क फोर्स मार्गदर्शन करणार, वेबिनार कुठं पाहायचं?

CBSE 10th Compartment Results 2021: सीबीएसई दहावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?