UPSC SUCCESS STOTY :  प्रेमातून मिळालं अभ्यासात यश, प्रेयसीनं घातली अट म्हणून बनले IPS, आता बनतोय चित्रपट

| Updated on: Nov 26, 2022 | 5:09 PM

हा चरित्र चित्रपट राहणार नाही. युवकांना प्रेरणा मिळेल, असा हा चित्रपट असेल.

UPSC SUCCESS STOTY :  प्रेमातून मिळालं अभ्यासात यश, प्रेयसीनं घातली अट म्हणून बनले  IPS, आता बनतोय चित्रपट
मनोज कुमार शर्मा
Follow us on

प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छतो. त्यासाठी प्रचंड परिश्रम करतात. पण, अपयशी ठरल्यास अनेक जण प्रयत्न करणं सोडून देतात. आज आपण आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्याबाबत जाणून घेणार आहोत. मनोज कुमार बारावी नापास आहेत. पण, त्यांनी कधी पराभव पत्करला नाही. देशातील सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा पास होऊन आयपीएस अधिकारी बनले.  मनोज शर्मा हे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी. लहानपणी त्यांना आयएएस अधिकारी बनावं असं वाटत होतं. पण, दुर्दैवानं बारावीत नापास झाले. एवढचं नाही तर नववी आणि दहावीत त्यांना थर्ड क्लास मिळाला. मनोज कुमार हिंदी विषय सोडून सर्व विषयांत नापास झाले. परंतु, त्यांनी यशाचा मार्ग बंद केला नाही. त्यांनी हार मानली नाही. देशातील सर्वात कठीण समजली जाणारी यूपीएससी उत्तीर्ण केली.

मनोज कुमार यांनी बारावी नापास नावाच्या पुस्तकात कहाणी लिहिली. त्यात त्यांनी लिहीलं की, ग्वालीयरमध्ये राहत असताना टेम्पो चालविला. रात्री झोपायला जागा मिळत नसल्यानं ते भिकाऱ्यांसोबत झोपत असतं.

दिल्लीतील एका वाचनालयात चपराश्याचं काम केलंय. तिथं त्यांनी मॅक्सिम गार्की, अब्राहन लिंकन, मुक्तीबोध अशी पुस्तकं वाचली. या पुस्तकं वाचून त्यांना जीवनाची वास्तविकता समजली.

मनोज कुमार शर्मा यांच्या पूर्ण प्रवासावर चित्रपट बनतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोपडा आहेत. चित्रपटाचं नाव ट्वेल्थ फेल राहील.

हा चरित्र चित्रपट राहणार नाही. युवकांना प्रेरणा मिळेल, असा हा चित्रपट असेल. याची शुटिंग दिल्लीतील मुखर्जी नगरात झाली. येथेचं मनोज कुमार यांनी तयारी केली होती.

दोन वेळा प्रेम केल्यामुळं नापास होण्याची वेळ आली. चौथ्या प्रयत्नात प्रेम केल्यामुळं पास झाले. बारावीत शिकताना एका मुलीच्या प्रेमात पडले होते. परंतु, प्रेम व्यक्त करू शकले नाही.

एकतर्फी प्रेमानं ते घाबरले होते. नंतर मनोज कुमारनं कठीण परिश्रम केलं. २००५ मध्ये महाराष्ट्र आयपीएस झाले.