BIG NEWS | देशभरात ‘या’ विषयातलं मास्टर डिग्रीचं शिक्षण कायमचं बंद, UGC चा मोठा निर्णय

| Updated on: Dec 27, 2023 | 6:51 PM

यूजीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूजीसीने एका विषयाची मास्टर डिग्री रद्द केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या डिग्रीसाठी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. या डिग्रीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असा स्पष्ट आदेश यूजीसीने महाविद्यालयांना दिला आहे.

BIG NEWS | देशभरात या विषयातलं मास्टर डिग्रीचं शिक्षण कायमचं बंद, UGC चा मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली | 27 डिसेंबर 2023 : महाविद्यालयीन एम. फील डिग्री कायमची बंद होणार आहे. यूजीसीने याबाबतचा खूप मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम. फील डिग्रीचं अ‍ॅडमिशन न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री आता कायमची बंद होणार आहे. यूजीसीचे सेक्रेटरी मनीष जोशी यांनी महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांनादेखील या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन न घेण्याचं आवाहन केलं आहे. यूजीसीकडून याबाबतचा आदेश आजच पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम. फील डिग्रीसाठी अ‍ॅडमिशन अधिकृतपणे बंद होणार आहे.

यूजीसीने याबाबत नोटीस जारी केली आहे. एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही, असं युसीजीने स्पष्ट केलं आहे. एम. फील म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षांची पोस्टग्रॅज्युएट अ‍ॅकेडमिक रिसर्च प्रोग्राम होतं, जे पीएचडीसाठी प्रोव्हिजन इनरोलमेंटसारखं काम करतं. पण आता युजीसीने डिग्रीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन घेता येणार नाही.

2020 मध्येच शिफारस करण्यात आली

काही महाविद्यालयं एम.फीलच्या शिक्षणासाठी प्रेवश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करत आहेत. पण महाविद्यालयांनी तसं करु नये. कारण ही डिग्री मान्यता प्राप्त नाही, असं यूजीसीने म्हटलं आहे. या डिग्रीला डिस्कन्टीन्यू करण्याची शिफारस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून या डिग्रीला स्पष्टपणे नोटीस काढून अमान्य करण्यात आलं आहे.

2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यातच ही डिग्री बंद करण्यात आली आहे. महाविद्यालय अनुदान आयोग विनियम, 2022 तयार केला आहे, ज्याला 7 नोव्हेंबर 2022 ला भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आलं आहे, असं यूजीसीने नोटीसमध्ये म्हटलं आहे.