माझ्याकडे वेळ नाही, अनुपम खेर यांनी FTII चं चेअरमनपद सोडलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

पुणे: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII च्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. इंटरनॅशनल टीव्ही शोसाठी त्यांनी एफटीआयआयचं चेअरमनपद सोडलं आहे. इंटरनॅशनल शो मुळे FTII ला  वेळ देता येत नाही, त्यामुळे पद सोडत असल्याचं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे. अनुपम खेर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर 2017 मध्ये FTII च्या […]

माझ्याकडे वेळ नाही, अनुपम खेर यांनी FTII चं चेअरमनपद सोडलं!
Follow us on

पुणे: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII च्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. इंटरनॅशनल टीव्ही शोसाठी त्यांनी एफटीआयआयचं चेअरमनपद सोडलं आहे. इंटरनॅशनल शो मुळे FTII ला  वेळ देता येत नाही, त्यामुळे पद सोडत असल्याचं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे. अनुपम खेर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर 2017 मध्ये FTII च्या चेअरमनपदाचा भार स्वीकारला होता.

अनुपम खेर हे एका आंतरराष्ट्री टीव्ही मालिकेत व्यस्त आहेत. त्यामुळे एफटीआयआयला वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. अनुपम खेर हे अमेरिकेतील मेडिकल ड्रामा सिरीजमध्ये डॉ. अनिल कपूर यांची भूमिका साकारत आहेत. त्यामध्ये ते व्यस्त असल्याने FTII ला वेळ देऊ शकत नाहीत.

अनुपम खेर यांचं राजीनामा पत्र

राजीनामा पत्रात अनुपम खेर म्हणतात, “प्रख्यात FTII चा चेअरमन म्हणून काम करणं माझ्यासाठी सन्मानजनक, गौरवशाली आणि उत्तम अनुभवाचं ठरलं. पण माझ्या आंतरराष्ट्रीय कामांमुळे मी सध्या वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. धन्यवाद”

वर्षभरापूर्वी नियुक्ती

अनुपम खेर यांची ऑक्टोबर 2017 मध्ये FTII च्या चेअरमनपदी नियुक्ती झाली होती. वादग्रस्त चेअरमन गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांनी एफटीआयआयचा पदभार स्वीकारला होता.

पद्मभूषण, पद्मश्रीने सन्मानित

अनुपम खेर हे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेतच, शिवाय ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक आहेत. ते सातत्याने मोदी सरकारचे पाठिराखे राहिले आहेत. मात्र त्यांनी अभिनय क्षेत्रात केलेल्या कामाची तोड नाही. त्यामुळेच त्यांना 2004 मध्ये पद्मश्री पुरस्कार तर 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता.

500 पेक्षा जास्त सिनेमात काम

अनुपम खेर यांनी 500 पेक्षा जास्त सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

त्यांनी अनेक विनोदी भूमिकाही केल्या आहेत. अनुपम खेर यांना पाच वेळा विनोदी भूमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

FTII चे दिग्गज चेअरमन

यापूर्वी दिग्गजांनी FTII या नामांकित संस्थेचे चेअरमनपद सांभाळलं आहे. यामध्ये श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, सईद मिर्झा, महेश भट्ट, मृणाल सेन, विनोद खन्ना, गिरीष कर्नाड यासारख्या दिग्गजांचा समावेश होता.