Brahmastra: बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘ब्रम्हास्त्र’ आता OTT वर होणार प्रदर्शित

| Updated on: Sep 12, 2022 | 11:01 AM

या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली दाद मिळाली नसेल, परंतु चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकून निर्माते प्रचंड नफा कमावताना दिसतात. असे देखील घडले आहे,  की अनेक चित्रपटांनी केवळ ओटीटी अधिकार विकून त्यांचे बजेट पूर्ण केले आहे. पण OTT वर चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची मागणी पाहता अनेक प्लॅटफॉर्म चित्रपटांचे हक्क विकत घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

Brahmastra:  बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ब्रम्हास्त्र आता OTT वर होणार प्रदर्शित
Brahmastra
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारा रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) मल्टीस्टारर चित्रपट लवकरच OTT वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहेत. मीडियारिपोर्टनुसार लवकरच ब्रह्मास्त्र डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus  Hot star) दिसणार आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल. ‘ब्रह्मास्त्र’ (‘Brahmastra‘)या महिन्यात OTT वर रिलीज होणार आहे. पहिल्याच दिवशी चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कथा आणि संवादांवर प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही टीका केली असली, तरी उत्कृष्ट व्हीएफएक्स इफेक्टमुळे चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे. थिएटरमध्ये ब्रह्मास्त्रची कमाई सुरूच आहे. पण OTT प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता लवकरच हा चित्रपट या प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार आहे. वृत्तानुसार, हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात OTT वर प्रदर्शित होणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करण्यात घोषणा

ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीजची घोषणा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करण्यात आली. कॅलिफोर्निया, यूएसए मधील डिस्ने स्टुडिओच्या 23 व्या एक्स्पो कार्यक्रमादरम्यान, डिस्नेच्या इंटरनॅशनल कन्टेन्ट व सर्क्युलेशन अध्यक्षा, रेबेका कॅम्पबेल यांनी काही आठवड्यांनंतर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित करण्याची योजना उघड केली.यावरून डिस्ने प्लस हॉटस्टारने ब्रह्मास्त्रचे ओटीटी हक्क विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि लवकरच प्लॅटफॉर्मवरील दर्शकांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर ब्रह्मास्त्राचा आनंद घेता येईल. मात्र तो कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

डिस्ने प्लस हॉटस्टार चित्रपटांचे ओटीटी अधिकार खरेदी करण्यात पुढे

या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली दाद मिळाली नसेल, परंतु चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकून निर्माते प्रचंड नफा कमावताना दिसतात. असे देखील घडले आहे,  की अनेक चित्रपटांनी केवळ ओटीटी अधिकार विकून त्यांचे बजेट पूर्ण केले आहे. पण OTT वर चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची मागणी पाहता अनेक प्लॅटफॉर्म चित्रपटांचे हक्क विकत घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारने या दिवसांत इंडस्ट्रीतील दिग्गजांच्या चित्रपटांचे हक्क विकत घेतले आहेत. अलीकडेच अक्षय कुमारच्या ‘काठपुतली’ या चित्रपटाचा प्रीमियर त्याच्या व्यासपीठावर झाला. आता या प्लॅटफॉर्मवर रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ पाहता येणार आहे.

हे सुद्धा वाचा