भेट नाकारल्याने चाहत्याने अभिनेत्याच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेतलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

बंगळुरु: कन्नड अभिनेता यश हा त्याच्या ‘केजीएफ’ या सिनेमानंतर खूप प्रसिद्ध झाला. या सिनेमानंतर त्याच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली. पण कधी कधी चाहते असं काही करुन जातात ज्यामुळे त्या कलाकारांना सुखद नाही तर दुखद धक्का बसतो. असचं काही यश सोबत घडलं, जेव्हा त्याच्या एका चाहत्याने यशच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेतलं. 8 जानेवारीला यशने आपला 33 वा […]

भेट नाकारल्याने चाहत्याने अभिनेत्याच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेतलं
Follow us on

बंगळुरु: कन्नड अभिनेता यश हा त्याच्या ‘केजीएफ’ या सिनेमानंतर खूप प्रसिद्ध झाला. या सिनेमानंतर त्याच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली. पण कधी कधी चाहते असं काही करुन जातात ज्यामुळे त्या कलाकारांना सुखद नाही तर दुखद धक्का बसतो. असचं काही यश सोबत घडलं, जेव्हा त्याच्या एका चाहत्याने यशच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेतलं.

8 जानेवारीला यशने आपला 33 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी यशच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या घरासमोर गर्दी केली. याच चाहत्यांमध्ये रवीशंकर नावाचा 26 वर्षीय तरुणही आला होता. रवीने यशला भेटण्याचे खूप प्रयत्न केले. तो बराच वेळ त्याच्या घरासमोर उभा होता. रवीला यशच्या घरी जायचे होते, मात्र त्याला घरात जाऊ दिले नाही, यशला भेटू दिले नाही. यामुळे निराश झालेल्या यशच्या या चाहत्याने त्याच्या घरासमोर स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं.

या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि रवीला विक्टोरिया रुग्णालयात दाखल केलं. पण या घटनेत रवीचं शरीर 70 टक्के भाजलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

रवीशंकर हा दरवर्षी यशच्या वाढदिवसाला त्याला भेटायला जायचा, त्याच्या सोबत सेल्फी काढायचा. मात्र यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अंबरीश यांचे निधन झाल्याने यशने त्याचा वाढदिवस साजरा केला नाही. त्यामुळे तो त्याच्या चाहत्यांनाही भेटला नाही. याबाबत त्याने आधीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

दरम्यान रवीच्या वडिलांनी सांगितले की, तो दरवर्षी यशला भेटायला जायचा, मागील वर्षी तो आम्हालाही सोबत घेऊन गेला होता. मात्र यावर्षी आम्ही त्याला नको जाऊ असे सांगितले, तरीही तो गेला, असं सांगत त्यांनी आपले दुख: व्यक्त केले. दुसरीकडे अभिनेता यशने रवीच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले.

अभिनेता यश हा रवीला भेटायला रुग्णालयात गेला तेव्हा तो चिंतीत आणि रागात होता. या घटनेवर यशने दुख: व्यक्त केले. “हे फॅन्डम नाही. मी नाही मानत की, असा कुणी फॅन असू शकतो. मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की, असा कुठलाही निर्णय घेऊ नका. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं होतं. मी यानंतर कुणालाही अशाप्रकारे भेटायला जाणार नाही, नाहीतर माझ्या चाहत्यांना चुकीची संदेश मिळेलं, त्यांना  वाटेल की असं काही केल्याने मी त्यांना भेटायला जाईल”, असेही यश म्हणाला.

कन्नड अभिनेता यश हा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या केजीएफ या सिनेमामुळे कन्नड प्रेक्षकांमध्येच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर दमदार कमाई केली.