रिव्हू: केदारनाथ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

वादावादीनंतर अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा केदारनाथ सिनेमा रिलीज झाला आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या सिनेमात सुशांतसिंह राजपूतने आणखी एक नवी भूमिका साकारली आहे. यापूर्वी अभिषेक कपूर आणि सुशांतसिंहची जोडी ‘काय पो चे’ या सिनेमात एकत्र आली होती. आता केदारनाथच्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र आले आहेत. केदारनाथ रिव्ह्यू केदारनाथ सिनेमाचं कथानक मंदिराच्या आसपास वसलेल्या वस्तीभोवती आहे. […]

रिव्हू: केदारनाथ
Follow us on

वादावादीनंतर अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा केदारनाथ सिनेमा रिलीज झाला आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या सिनेमात सुशांतसिंह राजपूतने आणखी एक नवी भूमिका साकारली आहे. यापूर्वी अभिषेक कपूर आणि सुशांतसिंहची जोडी ‘काय पो चे’ या सिनेमात एकत्र आली होती. आता केदारनाथच्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र आले आहेत.

केदारनाथ रिव्ह्यू

केदारनाथ सिनेमाचं कथानक मंदिराच्या आसपास वसलेल्या वस्तीभोवती आहे. भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचवणारा मुस्लिम तरुण मन्सूरचे ब्राह्मण मुलगी मुक्कूवर प्रेम जडतं. मात्र मुक्कूच्या कुटुंबाचा त्याला विरोध असतो. शेवटी रातोरात मुक्कूचं लग्न करुन दिलं जातं. मात्र मन्सूरच्या प्रेमाची शिक्षा सर्व मुस्लिमांना भोगावी लागते. नेमकं काय घडतं ते सिनेमात पाहावं लागेल.

या सिनेमात उत्तराखंडमधील निसर्गसौंदर्य दाखवण्यात आलं आहे. गगनाला भिडलेले डोंगर आणि खळखळ वाहणाऱ्या नद्या डोळ्याचं पारणं फेडतात. या सिनेमात व्हिएफएक्सचाही उत्तम वापर करण्यात आला आहे. मात्र पुराची स्थिती दाखवण्यात दिग्दर्शकाला तितकंसं यश आलं नाही.

अभिनेत्री सारा अली खानने उत्तम भूमिका केली आहे. दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतनेही भूमिकेला न्याय दिला आहे. यावेळी त्याने डायलॉगसह चेहऱ्यावरील हावभाव उत्तमरित्या दाखवले आहेत.

 बॉक्स ऑफिस

मीडिया रिपोर्ट्सनुसार केदारनाथ सिनेमाचं बजेट 35 कोटी रुपयांचं आहे. हा सिनेमा 2 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

 

चित्रपट: केदारनाथ

दिग्दर्शक: अभिषेक कपूर

कलाकार: सुशांत सिंह राजपूत, सारा अली खान, पूजा गौर, नितीश भारद्वाज

चित्रपट कालावधी: 2 तास 25 मिनिटे

रेटिंग: 3