zero movie review: मेरठ ते मंगळ, प्रेमाचा त्रिकोण: झिरो

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

ख्रिसमस वीकेंडच्या मुहुर्तावर अभिनेता शाहरुख खानचा झिरो हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माही प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन तनू वेड्स मनूचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी केलं आहे. सिनेमाची कथा बऊआ सिंह (शाहरुख खान) मेरठचा रहिवासी आहे. तो बुटका आहे. मात्र मनाने खूप मोठा आहे. त्याला आफिया (अनुष्का […]

zero movie review: मेरठ ते मंगळ, प्रेमाचा त्रिकोण: झिरो
Follow us on

ख्रिसमस वीकेंडच्या मुहुर्तावर अभिनेता शाहरुख खानचा झिरो हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माही प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन तनू वेड्स मनूचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी केलं आहे.

सिनेमाची कथा

बऊआ सिंह (शाहरुख खान) मेरठचा रहिवासी आहे. तो बुटका आहे. मात्र मनाने खूप मोठा आहे. त्याला आफिया (अनुष्का शर्मा) नावाच्या वैज्ञानिकेसोबत प्रेम होतं. मात्र ती सुद्धा एका आजाराने त्रस्त आहे. दोघांची ही प्रेमकहाणी भारतापासून अमेरिकेपर्यंत पोहोचते आणि तिथून अंतराळात. या प्रेमकहाणीच्या प्रवासात बऊआ आणि आफियाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात.

रिव्ह्यू –

झिरोचं कथानक रंजक आहेच शिवाय ही संकल्पनाही प्रेरणादायी आहे. मेरठपासून मंगळापर्यंतच्या कहाणीला विज्ञान, ग्रह-ताऱ्यांमधून सजवण्यात आलं आहे. हे सर्व अविश्वसनीय आहे. हा प्रवास कल्पनाविस्तारावर बेतला असताना अनेक त्रुटीही जाणवतात. एकाचवेळी अनेक विचार मांडताना दिग्दर्शकाचा गोंधळ उडाल्याचं भासतं. सिनेमातील काही सीन दमदार आहेत, तर काही खूपच तकलादू.

मेरठमधील बऊआ सिंह वडीलांचा (तिग्मांशू धुलिया) सर्व पैसा बॉलिवूड सुपरस्टार बबिता कुमारी अर्थात कतरिना कैफवर उडवतो. तो बबितावर फिदा असतो. पोराचं असं कृत्य पाहून बाप खूपच रागराग करत असतो. मात्र बऊआ जेव्हा हुशार वैज्ञानिक आफियाला भेटतो तेव्हा सर्व चित्र बदलतं.

दोघेही शारिरकदृष्ट्या सर्वसामान्य नसल्यामुळे दोघांमध्ये नवं नातं तयार होतं. मात्र दोघांच्या व्यक्तिमत्त्वात जमीन-आसमानाचा फरक असतो. नेमकी हीच बाजू सिनेमात दमदारपणे मांडली आहे. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेत्री बबिता कुमारी बऊआ आणि आफियाच्या आयुष्यात एण्ट्री घेते आणि सर्व ड्रामा सुरु होतो.

शाहरुखच्या अभिनयावर कोणीही शंका उपस्थित करु शकणार नाही. कतरिनाची भूमिका छोटी आहे, मात्र तिने ती उत्तमरित्या साकारली आहे. दुसरीकडे अनुष्का शर्माने लौकिकाला साजेसं काम केलं आहे.

सिनेमातील ‘मेरे नाम तू’ गाणं थिरकायला लावतं. सिनेमा तुम्हाला आवडू शकतो. मात्र केवळ मनोरंजन हाच हेतू असेल तर ते सिनेमात दिसलं नाही.

 

चित्रपट: झिरो

दिग्दर्शक:  आनंद एल राय

कलाकार: शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कतरिना कैप

रेटिंग: 3