परिणीती चोप्राने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडले मौन, तीन ओळीत सांगितले सर्व काही

| Updated on: Mar 28, 2024 | 8:33 PM

अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकताच तिच्या 'चमकिला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केलाय. यावेळी ती काळ्या रंगाचा सुंदर कफ्तान ड्रेस परिधान करून आली होती, त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. पण अभिनेत्रीने यावर आता खुलासा केला आहे.

परिणीती चोप्राने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडले मौन, तीन ओळीत सांगितले सर्व काही
Follow us on

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या प्रग्नेंट असल्याची सध्या चर्चा आहे. गुरुवारी सकाळी ती विमानतळावर पफर जॅकेटमध्ये दिसली होती. तेव्हापासून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झालीये. अभिनेत्रीने सप्टेंबर २०२३ मध्ये आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत विवाह केला होता. आता मुंबईत ती पफर जॅकेटवर दिसल्याने तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की ती गरोदर आहे. परिणीती सध्या ‘चमकिला’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये दिलजीत दोसांझ आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत काळ्या कफ्तान ड्रेसमध्ये पोहोचली होती, ज्यानंतर लोकांमध्ये पुन्हा ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली. परिणीतीने स्वतः तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर आनंद लुटला आहे.

काय म्हणाली परिणीती चोप्रा

परिणीती चोप्राचा पोशाख आणि ती ज्या प्रकारे पोटाला स्पर्श करत होती त्यामुळे हा अंदाज लावला जात आहे. मात्र, अभिनेत्रीने आता या अफवांचे अत्यंत गमतीशीरपणे खंडन केले आहे. परिणीतीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली ज्यामध्ये तिने हसत हसत इमोजीसह लिहिले की, ‘काफ्तान ड्रेस = गर्भधारणा, ओव्हरसाइज शर्ट = गर्भधारणा, आरामदायक कुर्ता = गर्भधारणा.’

‘चमकिला’चा ट्रेलर लॉन्च

दरम्यान, चित्रपटाच्या कलाकारांसह चमकीला सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. अमर सिंह चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत चमकीला यांच्या जीवनावर आधारित ‘चमकिला’ सिनेमा बनवला गेला आहे. दिलजीत आणि परिणीती या दोघांनीही काही पंजाबी गाण्यांना आवाज दिला आहे. ए आर रहमानने त्याला संगीत दिले आहे. अमरजोतच्या पात्रात येण्यासाठी परिणीतीने 15 किलो वजनही वाढवले ​​होते.

‘चमकिला’ची कथा आणि रिलीज डेट

‘चमकिला’ यांना पंजाबचा एल्विस प्रेस्ली म्हटले जाते. दुर्दैवाने, एका परफॉर्मन्सची तयारी करत असताना, पंजाबमधील मेहसमपूरमध्ये तो आणि त्याची पत्नी अमरजोत यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने चमकिलाचे आयुष्य संपले. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून त्वरीत पलायन केले असून या प्रकरणाचा अद्यापही उलगडा झालेला नाही. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.