सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचं ब्रेकअप; पुन्हा जुन्याच बॉयफ्रेंड सोबत फिरतेय

| Updated on: Sep 05, 2022 | 10:51 PM

सुष्मिताने पैसे बघून ललित यांना डेट केलं, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली होती. तर मोदी यांना फरार म्हणून ट्रोल करण्यात आले. दोघांनीही ट्रोलर्सला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता ललित मोदी आणि सुष्मिता यांच ब्रेकअप झाले आहे. सुष्मिता पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत दिसत आहे.

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचं ब्रेकअप; पुन्हा जुन्याच बॉयफ्रेंड सोबत फिरतेय
Follow us on

मुंबई : आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर फरार झालेले ललित मोदी (Lalit Modi) यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे एकच खळबळ उडाली होती. आता या दोघांचे ब्रेकअप झाले असून सुष्मिता तिच्या जुन्याच बॉयफ्रेंड सोबत फिरतेय. सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याच्यामुळेच यांचा ब्रेकअप झाल्याचेही बोलले जात आहे.

दीड महिन्यांपूर्वी ललित मोदी यांनी एक ट्विट केले होते. मोदी यांनी सुष्मितासोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते. या फोटोसह त्यांनी सुष्मितासह रिलेशनशिपमध्ये असल्याचा उल्लेख केला होता. माय बेटरहाफ असं म्हणत मोदी यांनी या ट्विटमध्ये सुष्मिताला टॅग केले होते. या ट्विटच्या माध्यामातूनच ललित मोदी यांनी सुष्मिता सोबतच्या रिलेशन शिप बाबत घोषणा केली. या रिलेशनशीप स्टेटसमुळे दोघेही चांगलेच ट्रोल झाले होते.

सुष्मिताने पैसे बघून ललित यांना डेट केलं, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली होती. तर मोदी यांना फरार म्हणून ट्रोल करण्यात आले. दोघांनीही ट्रोलर्सला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता ललित मोदी आणि सुष्मिता यांच ब्रेकअप झाले आहे. सुष्मिता पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत दिसत आहे.

ललित मोदी यांनी ब्रेकअपबाबत कोणतीही पोस्ट लिहीलेली नाही. मात्र, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर काही बदल केले आहेत. मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरुन सुष्मिताचा फोटो हटवला आहे. तसेच तिच्यासह असलेला प्रोफाइल पिक्चर देखील रिमूव्ह केला आहे.

मोदी यांनी सोशल मिडीयावर रिलेशनशिपची घोषणा केली तेव्हा त्यांच्या आणि सुष्मिताचा एकत्रित फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर प्रोफाइल फोटो म्हणून ठेवला होता. आता फोटो चेंज करुन त्यांनी फक्त एकट्याचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवला आहे.

यापूर्वी बायोमध्ये त्यांनी माय लव्ह सुष्मिता असं लिहीले होते. ते हटवून त्यांनी आता बायोमध्ये फक्त आयपीएल फाऊंडर असे लिहीले आहे. या सर्व बदलांवरुन त्यांचा ब्रेकअप झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

दरम्यान, सुष्मिता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल हे दोघं पुन्हा एकत्र दिसत आहेत. दोघांनी डिंसेबर मध्ये ब्रेकअप झाल्याची घोषणा केली होती. यानंतर जुलै मध्ये सुष्मिता सेन आणि ललित मोदी रिलेशनशिप मध्ये आल्याच्या चर्चा रंगल्या.