‘या’ आजाराने त्रस्त असल्याने, ब्रूस विलिस यांनी स्विकारली निवृत्ती… आजारामुळे वाचने, लिहिणे आणि बोलणेही होते कठीण

| Updated on: Apr 16, 2022 | 7:39 PM

हॉलिवूड अभिनेता ब्रूस विलिसने चित्रपट उद्योगातून निवृत्ती घेतली आहे. यामागचे कारण म्हणजे त्यांचा आजार, ज्याचे नाव ‘अ‍ॅफेसिया’ aphagia आहे, aphagia म्हणजे हा एक मेंदूचा विकार आहे. त्याची लक्षणे काय आहेत आणि आपण त्याचा सामना कसा करू शकतो? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे...

‘या’ आजाराने त्रस्त असल्याने, ब्रूस विलिस यांनी स्विकारली निवृत्ती... आजारामुळे वाचने, लिहिणे आणि बोलणेही होते कठीण
‘या’ आजाराने त्रस्त असल्याने, ब्रूस विलिस यांनी स्विकारली निवृत्ती
Image Credit source: TV9
Follow us on

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ब्रूस विलिसने चित्रपटसृष्टीतून निवृत्ती (Retirement) घेतली आहे. याचे कारण म्हणजे त्याचा दुर्मिळ आजार आहे. ज्याचे नाव ‘अ‍ॅफेसिया’ (Aphasia) आहे. ब्रूस विलिस यांच्या मुलीने ही माहिती दिली असून, ती म्हणाली, माझे 67 वर्षीय वडील अ‍ॅफेसिया नावाच्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच तो अभिनयातून निवृत्ती घेत आहे. आकडेवारीनुसार, देशातील 65 वर्षे वयोगटातील 15 टक्के लोक या मानसिक विकाराने ग्रस्त आहेत. ‘अ‍ॅफेसिया’ शी संबंधित काही लक्षणे (Some symptoms) या वयातील लोकांमध्ये नक्कीच आढळतात. ब्रुसने त्याच्या कारकिर्दीत पल्प फिक्शन, सिन सिटी, 12 मंकी, द फिफ्थ एलिमेंट, आर्मगेडन आणि द सिक्थ सेन्स यासह 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘अ‍ॅफेसिया’ म्हणजे काय ?

हा मेंदूचा विकार असून, यात वाचाशक्ती नाहीशी होणे, गिळणाच्या शक्तीचा अभाव होणे अशा समस्या निर्माण होतात. अ‍ॅफेसिया या विकारात, ज्यामध्ये मेंदूचा जो भाग बोलणे, वाचणे आणि लिहिणे यांच्याशी निगडीत आहे तो खराब होतो. या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये नीट बोलता न येणे, चुकीचे शब्द वापरणे, चुकीची वाक्ये बोलणे अशी लक्षणे दिसतात. वृद्धांमध्ये त्याची प्रकरणे अधिक सामान्य आहेत. ब्रेन स्ट्रोक, डोक्याला दुखापत, मेंदूला संसर्ग झालेल्या अशा वृद्धांना याचा धोका जास्त असतो. याशिवाय मेंदूमध्ये ट्यूमर झाल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते. रुग्णाची प्रकृती किती गंभीर असेल हे त्याच्या मेंदूला किती प्रमाणात नुकसान झाले आहे हे ठरवले जाते.

ही लक्षणे असल्यास, व्हा सावध

मेयो क्लिनिकच्या अहवालात असे म्हटले आहे की, अशा रुग्णांमध्ये काही लक्षणे दिसली तर ते त्याकडे लक्ष वेधतात. उदाहरणार्थ, अर्ध्या-अपूर्ण गोष्टी बोलणे, काही अर्थ नसलेली वाक्ये वापरणे, रुग्ण काय बोलत आहे ते समजत नाही किंवा इतर काय बोलत आहेत हे समजू शकत नाही. तुम्हाला बोलण्यात, शब्द समजण्यात, वाचण्यात किंवा लिहिण्यात समस्या येत असल्यास, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

उपचार कसे केले जातात?

तज्ज्ञांच्या मते, त्याचे उपचार रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. अशा वेळी लँग्वेज थेरपी आणि टॉक थेरपी वापरली जाते. याशिवाय उपचारासाठी ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. हे मनाला चालना देणारे तंत्र आहे. याशिवाय, रुग्णाला बटाटे, केळी, टोमॅटो आणि सोयाबीनसारख्या उच्च पोटॅशियम पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. ते बीपी नियंत्रित करण्यास मदत करतात कारण उच्च रक्तदाबाचा थेट परिणाम मेंदूवर देखील होतो.

इतर बातम्या

Health : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा महत्वाचे!

India Corona Cases Update : आकडा वाढतोय, गेल्या चोवीस तासात देशभरात हजाराच्या घरात नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू