कांजिण्या येण्याचं प्रमाण वाढतंय, जाणून घ्या कसे कराल बचाव

| Updated on: Mar 21, 2024 | 2:50 PM

चिकणपॉक्स म्हणजेच कांजिण्या येण्याचं प्रमाण वाढतं आहे. एका विशिष्ट विषाणूच्या संसर्गामुळे याचा संसर्ग होतो. याचा प्रसार देखील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकतो. यापासून लहान मुलांना कसे दूर ठेऊ शकतात जाणून घ्या.

कांजिण्या येण्याचं प्रमाण वाढतंय, जाणून घ्या कसे कराल बचाव
Follow us on

chikenpox : कांजिण्याचा संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान याचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढतं. गेल्या महिनाभरात लहान मुलांमध्ये कांजिण्या होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बदलते हवामान आणि वाढत्या तापमानामुळे या संसर्गजन्य आजारांची प्रकरणे देशात वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने कांजण्यांपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. राजीव जयदेवन सांगतात की, तापमान वाढले की या रोगाचा धोका वाढतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे, ज्यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या अंगावर पुरळ उठून ताप आणि इतर अनेक प्रकारच्या गुंतागुंत होऊ शकतात. कांजिण्यांसोबतच काही राज्यांमध्ये गोवर आणि गालगुंडाचे प्रमाणही वाढले आहे.

अनेक शहरांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. गोवर आणि कांजिण्यांसोबत गालगुंडाच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. अनेक दवाखान्यांमध्ये फुगलेले गाल आणि सुजलेल्या जबड्यांसह अनेक मुले दिसत आहेत.

या संसर्गजन्य आजारांचा मुलांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. म्हणूनच, पालकांनी प्रतिबंधात्मक उपाय करत राहणे महत्वाचे आहे जेणेकरून मुलांमधील या संसर्गजन्य रोगांचा धोका कमी करता येईल.

कशामुळे होतात कांजिण्या

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कांजिण्या व्हॅरिसेला-झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो. संक्रमित व्यक्तीच्या शरीरावरील पुरळ थेट संपर्कात आल्याने त्याचा प्रसार होण्याचा धोका असू शकतो. चिकनपॉक्सने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला खोकला किंवा शिंक येते तेव्हा हा संसर्ग पसरण्याचा धोका देखील असू शकतो.

ज्या लोकांना याआधी कांजण्या झाल्या नाहीत किंवा कांजिण्यांसाठी लसीकरण केलेले नाही त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. एकदा कांजिण्या होऊ गेलेल्या लोकांमध्ये अँटिबॉडिज तयार झाल्यानंतर त्याचा धोका नंतर कमी असतो. पण काही लोकांना एकापेक्षा जास्त वेळा देखील कांजिण्या येऊ शकतात.

गोवर हा देखील बालवयात होणारा संसर्ग आहे. तो देखील इतरांपर्यंत सहज पसरतो. जेव्हा गोवर झालेली व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा त्याचा प्रचार होण्याची शक्यता असते. गोवर विरुद्ध बालकांचे लसीकरण केल्यास त्याचा परिणाम कमी होतो. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या संख्येने बालकांना लसीकरण न केल्यामुळे हा संसर्गजन्य रोग वाढण्याचा धोका आहे.

चिकनपॉक्स-गोवर टाळण्यासाठी उपाय

आरोग्य तज्ञांच्या मते, जर कांजण्या, गोवर आणि गालगुंड रोखायचा असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण करणे. लहान मुले, किशोरवयीन आणि प्रौढांसह प्रत्येकाने कांजिण्यांच्या लसीचे दोन डोस घेतले पाहिजे. MMR लस गोवर, कांजिण्या आणि गालगुंडापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. लोकांना संक्रमित लोकांपासून योग्य अंतर राखण्याचा सल्ला दिला जातो. वेळोवेळी हात स्वच्छ धुतले पाहिजे.