Corona Vaccine Dry Run | नव्या वर्षात सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन, केंद्राचा मोठा निर्णय

| Updated on: Dec 31, 2020 | 2:55 PM

देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ड्राय रनचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. corona vaccination dry run

Corona Vaccine Dry Run |  नव्या वर्षात सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन, केंद्राचा मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना लसीच्या (Corona Vaccine) पुरवठ्यासाठी चार राज्यांमध्ये ड्राय रनचे (Dry Run) यशस्वी आयोजन केल्यानंतर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. चार राज्यानंतर देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ड्राय रनचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं यापूर्वी कोरोना लसीचे ‘ड्राय रन’ चे आयोजन 28 आणि 29 डिसेंबर रोजी केले होते. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांमध्ये ड्राय रन आयोजित करण्यात आली होती. (corona vaccination dry run now plans to across the country)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी सर्व राज्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक राज्यांमध्ये ड्राय रन घेण्यासाठी तारखा निश्चित करण्यावर चर्चा झाली. प्रत्येक राज्यांमध्ये दोन ठिकाणी कोरोना लसीकरणसाठी ड्राय रनचं आयोजन केले जाणार आहे. कोरोना लसीचा साठा केलेला डेपो ते कोरोना लसीकरणाचं ठिकाणांवर पोहोचण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्रायरनचं आयोजन केले जाणार आहे.

लसीची ‘ड्राय रन’ म्हणजे काय?

कोणतीही लस लोकांना देण्यापूर्वी तिची ‘ड्राय रन’ घेतली जाते. या दरम्यान जर या लसीमध्ये काही समस्या किंवा त्रुटी आढळल्यास, नंतर त्यात सुधारणा केली जाऊ शकते. प्रत्यक्ष लसीकरणाप्रमाणेच ‘ड्राय रन’ची प्रक्रिया केली जाते. तथापि, या ड्राय रन दरम्यान लोकांना लसीचा डोस दिला जात नाही. केवळ त्या लोकांचा डेटा अपलोड केला जातो. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेंट आणि ऑनलाइन डेटा सिक्युरिटी यासारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या जातात.

अ‍ॅपच्या मदतीने डेटा ट्रॅक केला जाईल.

ड्राय रन दरम्यान डेटा कनेक्ट करण्यासाठी आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी सरकारने ‘को-विन’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले आहे. यामध्ये ड्राय रनशी संबंधित सर्व माहिती अपलोड केली जाईल. यामुळे लस वितरणाची थेट देखरेख करण्यास अनुमती मिळेल. यामध्ये लोकांना देण्यात आलेल्या लसीच्या डोसचा मागोवा घेतला जाईल. या लसीचे दोन डोस घेतल्यावर, यातून तुम्हाला डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. आपण लसीचा संपूर्ण डोस घेतल्याचा हा पुरावा असेल (What is the Dry Run of Corona vaccine)

आतापर्यंत भारतातील तीन फार्मा कंपन्यांनी त्यांच्या लसीच्या तातडीच्या वापरासाठी मान्यता मागितली आहे. फायझर या लसीच्या शर्यतीत आघाडीवर होती. 4 डिसेंबर रोजी त्यांनी लसीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारची परवानगी मागितली होती. भारतात, ऑक्सफोर्ड लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेनेही आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) सहकार्याने लस बनवणारी हैदराबादची कंपनी ‘भारत बायोटेक’ यांनीही लसीचा त्वरित वापर करण्यासाठी अर्ज केला आहे.

संबंधित बातम्या:

भारताच्या चार राज्यात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’, जाणून घ्या नेमकं काय होणार…

कोरोना लस टोचल्यानंतरही साईड इफेक्ट झाल्यास मेडिक्लेमचे पैसे मिळणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…..

(corona vaccination dry run now plans to across the country)