इंग्लंडहून आलेली खारघरची महिला कोरोना पॉझिटिव्ह, 30 ते 40 जणांची तपासणी सुरु

| Updated on: Dec 29, 2020 | 1:44 PM

इंग्लडंहून रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आलेल्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं यंत्रणा अ‌ॅलर्ट झालीय. (Kharghar woman corona positive)

इंग्लंडहून आलेली खारघरची महिला कोरोना पॉझिटिव्ह, 30 ते 40 जणांची तपासणी सुरु
लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना
Follow us on

रायगड: इंग्लडंहून रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आलेल्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यावर पनवेल कोविड सेंटरमध्ये येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. इंग्लडवरून खारघर येथील एक जोडपे 8 डिसेंबर रोजी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर दोघे खोपोली येथे आले. महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे रायगडची आरोग्य यंत्रणा अ‌ॅलर्ट झाली आहे. (England return Kharghar woman tested corona positive)

परदेशातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्य शासनाने आरोग्य विभागला दिले आहेत. यानुसार इंग्लडवरून खोपोली येथे आलेल्या जोडप्याची माहिती खोपोली नगरपरिषद आरोग्य विभागाला 24 डिसेंबर रोजी मिळाली. त्यानंतर 26 डिसेंबर रोजी पती आणि पत्नीची कोविड तपासणी करण्यात आली.

आज 29 डिसेंबर रोजी दोघांचा रिपार्ट आला असून यामध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तिच्या पतीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. संबधित महिलेला पनवेल येथील कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

परदेशात सध्या कोरोनाची दुसरी नवी लाट आली आहे. भारतातही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे येणाऱ्या प्रवाशांची कोरोनाची तपासणी केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील खारघर येथील सध्या खोपोली येथे राहत असलेली महिला पॉझिटिव्ह आढळल्यामुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्य यत्रंणा अलर्ट झाली आहे. या जोडप्याच्या सपंर्कात एकूण 30-40 जण आले असून सर्वांची माहिती घेऊन तपासणी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. खोपोली व खारघर येथील आरोग्य यत्रंणा सतर्क झाली असून सर्व प्रतिबधांत्मक उपायांची खबरदारी घेतली जातेय, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.

भारतात नव्या कोरोनाचे 6 रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ब्रिटनमधील नव्या विषाणूचे 6 रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. यासर्व 6 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, हे रुग्ण देशातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून 33 हजार व्यक्ती भारतात परतल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. या सर्व नागरिकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. 114 मध्ये 6 व्यक्तींच्या अहवालांमध्ये कोरोनाचा नवा घातक अवतार आढळला आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या नव्या घातक अवताराची भारतात एन्ट्री, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री

(England return Kharghar woman tested corona positive)