तुम्ही देखील कमी झोप घेताय तर तुम्हाला होऊ शकतो हा गंभीर आजार

| Updated on: Mar 07, 2024 | 8:05 PM

भारतातील लोकांचं आरोग्य हळूहळू धोक्यात आले आहे. भारतीय लोकांची बदलती जीवनशैली यामुळे भारतीयांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यातच अनेक भारतीय लोकं खूप कमी झोप घेतात. यामुळे तर तुम्ही देखील कमी झोप घेत असाल तर तुम्ही देखील आजारांना आमंत्रण देत आहात.

तुम्ही देखील कमी झोप घेताय तर तुम्हाला होऊ शकतो हा गंभीर आजार
Follow us on

Diabetes : मधुमेह हा एक असा आजार आहे जो झपाट्याने वाढतोय. भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. या आजारात शरीर योग्य प्रमाणात इंसुलिन तयार करू शकत नाही किंवा त्याचा योग्य वापर करू शकत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे हृदय, नसा इत्यादी शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ लागतो. आता भारताला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाऊ लागले आहे. कारण येथे दरवर्षी या आजाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

संशोधनात काय आले समोर

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च- डायबिटीज इंडियानुसार, 2023 मध्ये सुमारे 10.1 कोटी मधुमेहाचे रुग्ण आढळले होते. IDF डायबिटीज ऍटलसच्या 2021 च्या सर्वेक्षणानुसार, जगभरात चीननंतर भारतात मधुमेहाची सर्वाधिक प्रकरणे आहेत, जी येत्या 20 वर्षांमध्ये जवळपास दुप्पट होऊ शकतात.

हा आकडा नक्कीच चिंता वाढवणारा आहे, कारण या आजारामुळे एखाद्याला कोणत्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. व्यक्तीची खराब जीवनशैली यामुळे तो वाढत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमी झोप यामुळे आपल्या आरोग्यात बरेच बदल झाले आहेत. एका संशोधनात आपली झोप आणि मधुमेह यांच्यातील संबंधही समोर आला आहे.

रोज किती तास झोप घेणे महत्त्वाचे

जामा ओपन नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक दररोज फक्त 3-5 तास झोप घेतात त्यांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. संशोधनात असे आढळले की, फक्त 3-5 तास झोपणाऱ्या व्यक्तींना टाइप-2 मधुमेहाचा धोका असतो, परंतु निरोगी खाण्याच्या सवयींनी मधुमेहाचा धोका कमी केला जाऊ शकतो. जे लोक निरोगी आहाराचे पालन करतात परंतु 6 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना देखील मधुमेहाचा आजाराचा धोका असतो.

त्यामुळे झोप ही किती महत्त्वाची आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी करायचा असेल तर तुम्हाला झोपण्याची सवय सुधारावी लागेल. अन्यथा तुम्ही देखील  मधुमेहाला बळी पडू शकता. त्यामुळे प्रत्येकाने दररोज वेळेवर झोपणे आवश्यक आहे.