Strange Love Story: न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन; 18 वर्षाचीआसिया आणि 61 वर्षाचा शमशाद; पाकिस्तानातील निकाह चर्चेत

| Updated on: Jun 30, 2022 | 3:31 PM

न उम्र की सीमा हो, न जनम का हो बंधन… जगजीत सिंग यांची ही गझल अत्यंत लोकप्रिय आहे. या गझलप्रमाणे खरोखरच प्रेमकहानी पाकिस्तानात घडली आहे. 18 वर्षाची आसिया(Asiya) आणि 61 वर्षाचा शमशाद(shamshad). पाकिस्तानातील(Pakistan) या दोघांचा निकाह चांगलाच चर्चेत आला. या निकाहच्या निमित्ताने यांची अनोखी लव्ह स्टोरी(love story) व्हायरल झाली आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल 43 वर्षांचे […]

Strange Love Story:  न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन; 18 वर्षाचीआसिया आणि 61 वर्षाचा शमशाद; पाकिस्तानातील निकाह चर्चेत
Follow us on

न उम्र की सीमा हो, न जनम का हो बंधन… जगजीत सिंग यांची ही गझल अत्यंत लोकप्रिय आहे. या गझलप्रमाणे खरोखरच प्रेमकहानी पाकिस्तानात घडली आहे. 18 वर्षाची आसिया(Asiya) आणि 61 वर्षाचा शमशाद(shamshad). पाकिस्तानातील(Pakistan) या दोघांचा निकाह चांगलाच चर्चेत आला. या निकाहच्या निमित्ताने यांची अनोखी लव्ह स्टोरी(love story) व्हायरल झाली आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल 43 वर्षांचे अंतर आहे.

या दोघांच्या लव्ह स्टोरी व्हिडिओ स्वरुपात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे दोघे आपली प्रेमकहाणी सांगत आहे. आसिया आणि शमशाद यांची ही लव्ह स्टोरी फारचं इंटरेस्टींग आहे.

ल्व्ह स्टोरी युट्युबवर व्हायरल

पाकिस्तानातील रावळपिंडी येथे त्यांचा निकाह झाला. 18 वर्षीय आसिया 61 वर्षीय राणा शमशादच्या प्रेमात पडली आणि दोघांनी विवाह देखील केला आहे. विवाह करण्याच्या निर्णय घेतला तेव्हा आम्हाला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी यूट्यूब चॅनल Pak News 007 ने त्यांच्या या अनोख्या लव्ह स्टोरीचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे.

…म्हणून आसिया शमशाद यांच्यावर फिदा झाली

शमशाद हे रावळपिंडीचा रहिवासी आहेत. शमशाद यांना सामजिक कार्याची आवड आहे. ते परिसरातील गरीब मुलींचा विवाह लावतात. त्यांचे काम आसियाला खूप आवडले. त्यांचे समाजकार्य पाहून खूप प्रभावित झाली. दोन भेटीतच ते तिला इतके आवडले की तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, आपल्या वयात 43 वर्षाचे अंतर आहे. हे अशक्य असल्याचे ते म्हणाले. मात्र, यानंतर त्यांच्या या प्रेम कहाणीचा संघर्ष सुरु झाला.

प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं

प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात. त्या दोघांनी एकमेकांच्या साथीने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. त्यांवा विवाहाला विरोध झाला. अनेकांनी त्यांच्यावर टीका, टीपण्णी करत त्यांना ट्रोल देखील केले. अखेरीस त्यांचा निकाह झाला. या वयात माझे १८ वर्षांच्या आसियाशी लग्न झाले हा अनुभव माझ्यासाठी अविश्वसनीय असा आहे. माझे आसियाशी लग्न झाले यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि अल्लाहचे आभार मानतो असं शमशाद यांनी युट्युबवरील मुलाखतीत म्हंटले आहे. त शमशाद हे माझ्यासह माझ्या कुंटूंबियांची देखील भरपूर काळजी घेतात असं आसियाने म्हंटले आहे.

आसिया आणि शमशाद यांनी त्यांची प्रेम कहानी युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सांगीतली आहे. त्यांच्या व्हिडिओला आतापर्यंत ७२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.