35 लढाऊ विमानं एकाचवेळी सज्ज, अमेरिकेच्या शक्तीप्रदर्शनाचा थरार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

वॉशिंग्टन : आर्थिक महासत्ता असलेला अमेरिका युद्धसज्जतेतही जगाच्या किती तरी पुढे आहे. रशिया आणि अमेरिका हे असे दोन देश आहेत, ज्यांना युद्धसज्जतेबाबत तोड नाही. अमेरिकेने नुकत्याच एका ड्रिलमधून आपली युद्धसज्जता किती आहे, याचा ट्रेलर दाखवला आहे. अमेरिकन वायूसेनेने जारी केलेल्या या व्हिडीओत एकाच वेळी 35 लढाऊ विमानं उड्डाणासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. F-35 सुपरसोनिक ही […]

35 लढाऊ विमानं एकाचवेळी सज्ज, अमेरिकेच्या शक्तीप्रदर्शनाचा थरार
Follow us on

वॉशिंग्टन : आर्थिक महासत्ता असलेला अमेरिका युद्धसज्जतेतही जगाच्या किती तरी पुढे आहे. रशिया आणि अमेरिका हे असे दोन देश आहेत, ज्यांना युद्धसज्जतेबाबत तोड नाही. अमेरिकेने नुकत्याच एका ड्रिलमधून आपली युद्धसज्जता किती आहे, याचा ट्रेलर दाखवला आहे. अमेरिकन वायूसेनेने जारी केलेल्या या व्हिडीओत एकाच वेळी 35 लढाऊ विमानं उड्डाणासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.

F-35 सुपरसोनिक ही 35 शक्तीशाली विमानं रन वेवर दिसत आहेत. काही क्षणात ही विमानं उड्डाण घेऊ शकतात आणि शत्रूवर अक्षरशः तुटून पडतील. अमेरिकेन वायूसेनेच्या 419 आणि 388 व्या विंगकडून हे ड्रिल उटाह या भागात आयोजित करण्यात आलं होतं. फक्त 20 ते 40 सेकंदात हे विमान उड्डाण घेतात.

अमेरिकेची युद्धसज्जता आणि शक्ती दाखवण्यासाठी वायू सेनेकडून या ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. जमीन आणि हवेत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या लढाऊ विमानांचं हे ड्रिल होतं, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

F-35s ला अमेरिकेच्या लष्करामध्ये एक गेम चेंजर म्हणून पाहिलं जातं. या विमानाच्या डिझाईनचाही वाद नुकताच समोर आला होता. विमानाची किंमत, डाझाईन आणि विमान तयार करण्याच्या अनेक तारखा चुकवल्यामुळे या विमानावर टीकाही झाली होती.

भारताने काही दिवसांपूर्वीच रशियासोबत एस-400 वायू संरक्षण प्रणाली विकत घेण्यासाठी करार केला आहे. हा करार करु नये यासाठी भारतावर अमेरिकेचा दबाव होता. तरीही भारताने हा करार केला. अमेरिकेच्या F-35 विमानाचा हल्ला परतवून लावण्याची क्षमताही एस-400 मध्ये आहे. भारतही आपल्या वायूसेनेची सुसज्जता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राफेल करार हाही त्याचाच भाग आहे, जो भारतीय वायू सेनेसाठी बूस्टर डोस असेल, असं खुद्द वायूसेनेच्या प्रमुखांनीच काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

पाहा अमेरिकेच्या ड्रिलचा व्हिडीओ

https://www.youtube.com/watch?v=u4JBoCZA6gk