जमीन आणि पाण्यातून मारा करण्याची क्षमता, चीनची अद्ययावत बोट तयार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

बीजिंग : तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या आणि सर्वांपेक्षा हटके अशा वस्तू तयार करणाऱ्या चीनने यंदा पाण्यात आणि जमिनीवर चालणारी बोट तयार केली आहे. आज या बोटीचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. चीनने तयार केलेल्या बोटीमुळे जगभरात चीनचं कौतुक केलं जात आहे. ही बोट जमिनीवरुन हल्ला करण्यासाठी उपयोगी ठरेल, असं मत तेथील तज्ञांनी मांडलं आहे. This […]

जमीन आणि पाण्यातून मारा करण्याची क्षमता, चीनची अद्ययावत बोट तयार
Follow us on

बीजिंग : तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या आणि सर्वांपेक्षा हटके अशा वस्तू तयार करणाऱ्या चीनने यंदा पाण्यात आणि जमिनीवर चालणारी बोट तयार केली आहे. आज या बोटीचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. चीनने तयार केलेल्या बोटीमुळे जगभरात चीनचं कौतुक केलं जात आहे. ही बोट जमिनीवरुन हल्ला करण्यासाठी उपयोगी ठरेल, असं मत तेथील तज्ञांनी मांडलं आहे.


चीन शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशन (सीएसआईसी) च्या अंतर्गत वुचांग शिपबिल्डिंग इंडस्ट्री ग्रुपद्वारे ‘मरीन लिजर्ड’ ही बोट तयार करण्यात आली आहे. वुहानमध्ये 8 एप्रिलला ही बोट फॅक्टरीमधून बाहेर काढण्यात आली. 1200 किलोमीटर अंतरावरुन या बोटीला रिमोट कंट्रोलद्वारे ऑपरेटही करु शकता येते.

डिझेलवर चालणारी बोट हायड्रोजेटच्या मदतीने पुढे चालते आणि रडारपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी 50 नॉट वेगाने धावू शकते. ही बोट जमिनीवर पोहचल्यावर लपवलेले चार चाक बाहेर काढते. जमिनीवर 20 किलोमीटर प्रतितास वेगाने ही बोट धावते. चिनच्या संरक्षण मंत्रालयाच्या 178 अरब डॉलर बजेटच्या सहाय्याने चीनी लष्करातील हत्यारात वाढ करण्यात येत आहे.