पाकची ‘ब्युटी विथ ब्रेन’, दहशतवाद्यांचा हल्ला परतवणारी लेडी ऑफिसर!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

कराची: पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये चीनच्या दूतावासाजवळ दहशतवादी हल्ला झाला. आज सकाळी 9.30 वा हल्लेखोरांनी गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला. हल्लेखोर या परिसरात घुसले आणि त्यांनी तुफान गोळीबार केला. या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. दहशवाद्यांचा हल्ला परतवून लावण्याचं काम पाकिस्तानच्या जिगरबाज महिला अधिकाऱ्याने केलं. सध्या पाकिस्तानसह जगभरातून या […]

पाकची ब्युटी विथ ब्रेन, दहशतवाद्यांचा हल्ला परतवणारी लेडी ऑफिसर!
Follow us on

कराची: पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये चीनच्या दूतावासाजवळ दहशतवादी हल्ला झाला. आज सकाळी 9.30 वा हल्लेखोरांनी गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला. हल्लेखोर या परिसरात घुसले आणि त्यांनी तुफान गोळीबार केला. या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. दहशवाद्यांचा हल्ला परतवून लावण्याचं काम पाकिस्तानच्या जिगरबाज महिला अधिकाऱ्याने केलं. सध्या पाकिस्तानसह जगभरातून या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एसएसपी सुहाय अझीज तलपूर असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.

एसएसपी सुहाय अझीज यांनी स्वत: बंदूक हातात घेऊन दहशतवाद्यांशी दोन हात केले. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सुहाय अझीज यांनी स्वत: त्यांच्या टीमचं नेतृत्त्व करुन दहशतवाद्यांना उत्तर दिलं. हल्ल्यानंतर चीनच्या दूतावासाजवळ सर्वात आधी पोहोचणाऱ्या सुहाय अझीज एकमेव होत्या. सुहाय अझीज यांनी दाखवलेलं धाडस आणि त्यांच्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सुहाय अझीज यांनी या हल्ल्यादरम्यान दाखवलेली चालाखी वाखाणण्याजोगी होती. हल्ल्यानंतर दहशतवादी चीनच्या दूतावासात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सुहाय अझीज यांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार करत त्यांना गुंतवून ठेवलं. त्यांच्या या कृतीमुळे दहशतवाद्यांना दूतावासात घुसता आलं नाही. जर हे दहशतवादी दूतावासात घुसले असते आणि त्यांनी अधिकाऱ्यांना इजा पोहोचवली असती, तर पाकिस्तानची जगभरात आणखी छी थू झाली असती. मात्र सुहाय अझीज यांनी केवळ कराचीचीच नव्हे कर संपूर्ण पाकिस्तानची लाज राखली.

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत पाकिस्तानच्या दोन जवानांचा मृत्यू झाला, मात्र तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षारक्षकांना यश आलं. सुहाय अझीज यांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सहाय अझीज या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचं कुटुंब तांडो मुहम्मद खान जिल्ह्यातील भाई खान तलपूर गावात राहतं.  त्यांच्या गावात मुलींचं शिक्षण म्हणजे डोंगर पार करण्यासारखं होतं.

“जेव्हा माझ्या कुटुंबीयांनी माझं नाव शाळेत घातलं, तेव्हा नातेवाईकांनी माझ्या कुटुंबीयांना टोमणे मारणं सुरु केलं. त्या टोमण्यांना वैतागून आम्ही गाव सोडलं आणि जवळच्या शहरात स्थायिक झालो” असं सहाय अझीज यांनी सांगितलं.

सहाय अझीज यांचे वडील एक लेखक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत. आपल्या लेकीने मोठं व्हावं, नाव कमवावं असं त्यांचं स्वप्न होतं.

“माझ्या नातेवाईकांनी माझ्याशी सर्व संबंध तोडले. माझ्या मुलीने शिकावं अशी माझी इच्छा होती, मात्र तिने केवळ धार्मिक शिक्षण घ्यावं अशी नातेवाईकांची इच्छा होती. पण मी त्यांचं ऐकलं नाही. माझ्या मुलीला दर्जेदार शिक्षण दिलं”, असं सहाय अझीज यांच्या वडिलांनी सांगितलं.

सुहाय यांचं प्राथमिक शिक्षण खासगी शाळेत झालं. मग त्यांनी पुढे बी कॉममध्ये पदवी मिळवली. कॉमर्समधील पदवीमुळे सुहाय यांनी चार्टर्ड अकाऊटंट व्हावं अशी कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र समाजात त्या नोकरीला तितकीशी प्रतिष्ठा नव्हती, त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा दिली आणि पोलिसात दाखल झाले असं सुहाय यांनी सांगितलं.

दाऊदच्या घराजवळ हल्ला

पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये चीनच्या दूतावासाजवळ दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यातील दोन दहशतावाद्यांना ठार करण्यात यश आलं, तर काही पोलिसांचाही मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे जिथे चीनचं दूतावास आहे, त्याच्या काही अंतरावरच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं घर आहे. भारताचा नंबर एकचा शत्रू असलेला दाऊद इब्राहिम मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटातील प्रमुख आरोपी आहे. याशिवाय भारतातील अनेक दहशतवादी कारवांमध्येही त्याचा हात असल्याचा आरोप आहे.

दाऊद सध्या पाकिस्तानात राहतो. त्याचं घर क्लिफ्टन परिसरात आहे. त्याच्या घरापासून 150 मीटर अतंरावर चीनचं दूतावास आहे. या दूतावासाजवळ आज सकाळी तीन-चार दहशतवाद्यांनी गोळीबार केला.