वाटलं नव्हतं प्रेम चवीचंही भुकेलं असतं, ही Love Story वाचा, प्रेमाचा रस्ता कसा जिभेवाटे पोटात गेलाय….

पाकिस्तानी युट्यूबर सय्यद बासित अलीने ही लव्ह स्टोरी शेअर केली. त्यानंतर या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीचा किस्सा व्हायरल होतोय.

वाटलं नव्हतं प्रेम चवीचंही भुकेलं असतं, ही Love Story वाचा, प्रेमाचा रस्ता कसा जिभेवाटे पोटात गेलाय....
Image Credit source: social media
| Updated on: Oct 27, 2022 | 12:13 PM

प्रेम सौंदर्याचं (Beauty), भावनांचं, बुद्धिमत्तेचं भुकेलं असतं, हे आतापर्यंतच्या अनेक लव्ह स्टोरींतून (Love Story) ऐकलेलंय. पण प्रेम हे चवीचंही भूकेलं असतं, हे नव्यानंच समोर आलेल्या लव्ह स्टोरीतून उघड झालंय. या प्रेमानं मग वयाचं बंधनाही झुगारून दिलंय. या युनिक (Unique) लव्ह स्टोरीची सध्या खूपच चर्चा सुरु आहे.

दोघांच्या भेटीचा इंटरेस्टिंग किस्सा

तर ही लव्ह स्टोरी सुरु होते एका रिक्षातून. मुलाचं म्हणजेच 55 वर्षाच्या प्रियकराचं नाव रफिक. आणि प्रेयसी आहे 22 वर्षांची. आलिया. रिक्षातला एक मुलगा आलियाकडे वाईट नजरेनं पाहत होता. रफिकने त्याला धु धु धुतलं…

आलियाने काय कराव? आपल्याला अपेक्षित उत्तर नाही इथं. आलियाने त्याचे आभार मानण्याऐवजी रफिकलाच जोरात थप्पड दिली.

त्यानंतर हार मानली नाही. तिचा पाठलाग करत तो तिच्या घरी पोहोचला. दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली. वादाचा मुद्दा हळू हळू वितळला.  त्यानंतर दोघे एकमेकांकडे काही दिवस जात-येत होते.

रफिकने आलियाच्या घरी नोकरीसाठी विचारणा केली. तो चांगला कूक आहे. घरातली सगळी कामं करतो. एक दिवस आलियाच्या फर्माइशनुसार रफीकने तिच्यासाठी हांडी मटण बनवलं.

आलियाला ते एवढं आवडलं की या मटणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर मटण बनवणाऱ्या रफीकच्याच प्रेमात पडली. आता रफीक घरची सगळी कामं करतो आणि आलिया घरासाठीचा खर्च देते.

पाकिस्तानी युट्यूबर सय्यद बासित अलीने ही लव्ह स्टोरी शेअर केली. त्यानंतर या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीचा किस्सा व्हायरल होतोय.