रात्री झोपल्यावर पक्षी झाडांवरून का पडत नाहीत? काय कारण? वाचा

असं करणं माणसांना खूप अवघड जातं आणि बरेचदा त्यांचा झोपेतच तोल जातो. झोपेत माणूस पडणारच झोपल्यावर मेंदू पण आराम करत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पक्षी झाडांवर झोपलेला असताना खाली का पडत नाहीत? याबद्दल जाणून घेऊया.

रात्री झोपल्यावर पक्षी झाडांवरून का पडत नाहीत? काय कारण? वाचा
Birds sleeping
| Updated on: Jun 06, 2023 | 2:23 PM

मुंबई: जेव्हा माणूस झोपलेला असतो, तेव्हा त्याला झोपेशिवाय काहीच दिसत नाही. इतकंच नाही तर माणसाला झोपण्यासाठी अशी जागा हवी असते जिथे त्यांचं शरीर चांगलं राहू शकतं, त्यांना उभं राहून किंवा बसून झोपता येत नाही. असं करणं माणसांना खूप अवघड जातं आणि बरेचदा त्यांचा झोपेतच तोल जातो. झोपेत माणूस पडणारच झोपल्यावर मेंदू पण आराम करत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पक्षी झाडांवर झोपलेला असताना खाली का पडत नाहीत? याबद्दल जाणून घेऊया.

याला अनेक कारणे असल्याचे पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पक्षी खूप कमी झोपतात, तर माणसे एकाच वेळी गाढ झोपतात. याशिवाय पक्षी जेव्हा झोपतात तेव्हा त्यांचा एक डोळा उघडा असतो, अशा वेळी त्यांचा मेंदू सक्रिय राहतो. ते आपल्या मेंदूवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवतात की झोपेच्या वेळी त्यांच्या मेंदूचा काही भाग सक्रिय असतो.

एका मीडिया रिपोर्टनुसार, पक्ष्यांचा डावा मेंदू (हेमिस्फियर) सक्रिय असेल तर त्यांचा उजवा डोळा उघडतो आणि उजवा मेंदू (हेमिस्फियर) सक्रिय असताना डावा डोळा उघडतो. या प्रकारच्या झोपेच्या क्षमतेमुळे पक्षी झोपतानाही कोणत्याही धोक्यापासून स्वत:चे रक्षण करू शकतो. म्हणजे झोपेतही शिकारी जवळ असल्याचं पक्ष्याला जाणवतं. या कारणामुळेच पक्ष्याला स्वत:ला पडण्यापासून वाचवता येते.

Birds sleeping on a tree

याशिवाय त्यांच्या पायाच्या पोतामुळे ते झोपेत सुद्धा फांद्या पकडतात. झोपताना पक्ष्याचा पंजा एक प्रकारचे कुलूप म्हणून काम करतो. पक्ष्यांना गाढ झोपेसाठी लागणारा वेळ फक्त 10 सेकंदांचा असतो.