पहिली लालपरी ज्या मार्गावर धावली, त्याच दिवशी आता इलेक्ट्रीक बसही धावणार! अहमदनगर-पुणे प्रवासाची ती सुखद आठवण

| Updated on: May 12, 2022 | 3:03 PM

दळणवळणाचं सर्वसामान्यांसाठी हक्काचं साधन कोणतं जर असेल, तर ती एसटीच. ही एसटी सुरु झाली 71 वर्ष अगोदर. महाराष्ट्रातील सर्वात जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगरशी एसटीची नाळ जोडलेली आहे. याच शहरात पहिली एसटी रवाना झाली. देश स्वतंत्र होऊन एक वर्षच झालेलं. त्यानंतर एकाच वर्षात माळीवाडामधून नगर ते पुणे असा टप्पा पार करत पहिली एसटी बस मार्गस्थ झाली होती.

पहिली लालपरी ज्या मार्गावर धावली, त्याच दिवशी आता इलेक्ट्रीक बसही धावणार! अहमदनगर-पुणे प्रवासाची ती सुखद आठवण
Follow us on

एसटी महामंडळाच्या (State Transport Corporation) 1 जूनला वर्धापनदिन साजरा होईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) संपानंतर साजरा होणारा हा वर्धापनदिन महत्त्वाचा आणि तितकाच यादगारही असणार आहे. कार 1 जूनच्या अनेक आठवणी आहे. महाराष्ट्रातील पहिली एसटी ज्या मार्गावरुन धावली, त्यात मार्गावरुन आताच्या जमान्यातली ई-बस धावणार आहे. ही गोष्ट बरोबर 71 वर्ष जुनी आहे. या जुन्या गोष्टीसोबत सोन्यासारख्या आठवणीही (Golden memories) जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे 1 जून ही तारीख ऐतिहासिक होती आणि आता पुन्हा याच दिवशी आणखी एक इतिहास घडणार आहे. पुणे-अहमदनगर राज्यातली पहिली एसटी, महाराष्ट्राच्या जीवाभावाची लालपरी धावली होती. याच मार्गावर पहिली विद्युत बस ‘शिवाई’ चालवण्याचे नियोजन सुरु आहे. याच निमित्ता पहिल्या एसटीच्या प्रवासाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्यास निमित्त मिळालंय. या ऐतिहासिक दिवशी चाललेल्या ऐतिहासिक मार्गाची पहिली सफर यादगार होती.

लालपरीचा सोनेरी इतिहास

दळणवळणाचं सर्वसामान्यांसाठी हक्काचं साधन कोणतं जर असेल, तर ती एसटीच. ही एसटी सुरु झाली 71 वर्ष अगोदर. महाराष्ट्रातील सर्वात जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगरशी एसटीची नाळ जोडलेली आहे. याच शहरात पहिली एसटी रवाना झाली. देश स्वतंत्र होऊन एक वर्षच झालेलं. त्यानंतर एकाच वर्षात माळीवाडामधून नगर ते पुणे असा टप्पा पार करत पहिली एसटी बस मार्गस्थ झाली होती. त्यानंतर मार्ग बदलले. एसटींची संख्या वाढली. प्रवासी वाढले. एसटीचा आवाका वाढला. पण पहिल्या एसटीची ही ओळख आजही जशीच्या तशी अनेकांच्या मनात कायम आहे.

साल होतं 1948. पहिली एसटी बस सुरु झाली. नगर ते पुणे एसटी बस सेवेच्या शुभारंभानंतर एसटीनं अनेक मार्ग पाहिले. अनेक गावं पाहिली. गाव तिथे एसटी हे ब्रीद रुजवलं. गावखेड्याची ओळख होण्यास एसटीला फार वेळ लागला नाही, तो यामुळेच! सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी प्रवाशांना एसटी आपली वाटत होती.

कुणी चालवली होती माहितीये?

पहिली एसटी बस कुणी चालवली होती, याचीही माहिती समोर आली आहे. पहिल्या वाहिल्या एसटी बसचे चालक होते किसन राऊत आणि या एसटी बसचेवाहन होते लक्ष्मण केवटे. या दोघाही नगरच्याच लोकांनी ही एसटी पुण्यापर्यंत आणली होती. म्हणून पहिल्या एसटी बसला नगरी ओळख प्राप्त झाली होती.

कसं होतं बसचं डिझाईन?

नव्यानंच एखादी गोष्ट सुरु झाली, की लोकांना ती दिसते कशी याचं आकर्षण आजही आहे. आणि तेव्हाही होतं. एसटी बस बघण्यासाठी तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूल लोकं जमायची. या बसचं डिझाईन कसंय, यावरुनही तेव्हा चर्चा रंगली असलेच. पहिली एसटी ही लाकडाची बनलेली होती. त्या काळी पैशांमध्ये एसटीचं तिकीट दिलं जात होतं. सव्वाशे किलोमीटरच्या नगर-पुणे मार्गासाठीचं लास्ट तिकीट होतं अवघ्या अडीच रुपयांना. तीस प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था बसच्या आत केलेली होती. बसचं छप्पही लाकडीच होतं. कालंतरानं यात बदल होत गेले आणि एसटीनं नवनवं डिझाईन समोर येत गेलं. पण पहिल्या एसटीची आठवण आजही कायमच आहे.