Hijab Controversy : देशात हिजाबवरून मोठा बवाल, कोणत्या देशात हिजाब बॅन? कुठे काय नियम?

| Updated on: Feb 11, 2022 | 8:00 AM

सध्या हिजावरून राज्यात आणि देशात खूप मोठा वाद सुरू आहे. कर्नाटकातील गदारोळानंतर सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात हिजाबची चर्चा होत आहे. पण काही देशात सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तिथे हिजाबद्दल काही कडक नियम करण्यात आले आहेत.

Hijab Controversy : देशात हिजाबवरून मोठा बवाल, कोणत्या देशात हिजाब बॅन? कुठे काय नियम?
हिजाबवर या देशात बंदी
Follow us on

मुंबई : कर्नाटकातील हिजाब (Hijab Ban) वादानंतर सोशल मीडियावर हिजाबची (Hijab Controversy) चर्चा जोरात सुरु आहे. हिजाब बंदीवर अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. अनेक लोक विरोध करत आहेत तर अनेकजण हिजाबच्या बाजूने बोलत आहेत. भारतात सध्या तरी आपआपले धार्मिक कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का? की अनेक देशांनी धार्मिक कपड्यांवर बंदी घातली आहे. हिजाबवर अनेक देशांमध्ये बंदी नाही, परंतु अनेक देशांनी चेहरा झाकणाऱ्या कपड्यांबाबत बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत बुरखा (Burkha), नकाब किंवा चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर कोणत्या देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यात आपल्या शेजाऱ्याचा म्हणजे चीनचाही समावेश आहे. चीनमध्ये, हैनान बेटावरील अल्पसंख्याक उत्सूल समुदायाच्या लोकांवर काही निर्बंध लादण्यात आले होते. मुस्लिमांप्रमाणेच चीनच्या कम्युनिस्ट सरकारने त्यांच्यावरही धार्मिक निर्बंध लादले होते, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही विरोध झाला होता. हैनान बेट प्रांतातील सान्या शहरात, फक्त 10,000 लोकसंख्या असलेल्या छोट्या उत्सुल मुस्लिम समुदायाला त्यांचे पारंपरिक कपडे घालून शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये जाण्यावर घातलेल्या बंदीची जगभर चर्चा झाली होती.

फ्रान्स

आउटलुकच्या रिपोर्टनुसार, 2011 मध्ये चेहरा झाकणाऱ्या बुरख्यावर बंदी घालणारा फ्रान्स पहिला देश ठरला. याआधी याची शाळेतून याची सुरुवात झाली होती आणि 2004 मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर 2011 मध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आली होती.

स्वित्झर्लंड

2021 मध्ये स्वित्झर्लंडने बुरख्यावर बंदी घातली. या निर्णयानंतर धार्मिक स्वातंत्र्य, सुरक्षा, महिला हक्क याबाबत पुन्हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर 51 टक्के मतदारांनी दारूबंदीच्या बाजूनेही मतदान केले.

नेदरलँड

ऑगस्ट 2019 मध्ये नेदरलँड्समध्ये बुरखा, नकाबवरही अंशत: बंदी घालण्यात आली होती. तेथे सरकारने सार्वजनिक वाहतूक, सरकारी इमारती, शैक्षणिक संस्था, रुग्णालये इत्यादींमध्ये त्यांचा वापर करण्यास बंदी घातली होती. त्याचे पालन न केल्यास दंडाची तरतूद ठेवण्यात आली होती.

श्रीलंका

एप्रिल 2021 मध्ये, श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने बुरख्यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला. येथील काही हल्ले आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला, कारण त्या काळात श्रीलंकेत अनेक दहशतवादी हल्ले झाले.

बेल्जियम

जुलै 2011 मध्ये बेल्जियमने चेहरा झाकण्यावर बंदी घातली. तसे न केल्यास सात दिवस कारावास आणि दंड अशी शिक्षा असा कठोर कायदा करण्यात आला. येथे मोठ्या संख्येने मुस्लिम महिला राहतात.

ऑस्ट्रिया

ऑक्टोबर 2017 मध्ये, ऑस्ट्रियाने बुरखा आणि नकाबसह धार्मिक कपड्यांसह पूर्ण चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घातली. यासाठी 12 हजार रुपयांपर्यंतचा दंडही ठेवण्यात आला असून तोंड झाकणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात.

बल्गेरिया

2016 मध्ये, बल्गेरियाच्या संसदेने सुरक्षेच्या कारणास्तव चेहरा झाकण्यावर बंदी घातली. याशिवाय असे न करणाऱ्यांवर दंडाची तरतूद आहे.

Hijab : वाद कर्नाटकात तर मोर्चे महाराष्ट्रात का? सवाल विचारणाऱ्यांसाठी कुठे कुठे झाले आंदोलनं? पहा एका क्लिकवर?

Hijab : कर्नाटक हायकोर्टाचा हिजाबवाल्यांना पहिला झटका, कोर्ट म्हणालं, निकाल येईपर्यंत ‘नो’ धार्मिक पोषक

Hijab : खान सिस्टर्सचा जलवा, एका बुलेटवर Hijab घालून चौघीजणी करतायत flying kiss; हा Video पाहिलात का?