सर्व अमली पदार्थ एकसारखे नसतात.. जाणून घ्या स्मॅक, चरस, अफीम, हेरॉईन, गांजा यातील फरक !

| Updated on: Aug 31, 2022 | 9:32 AM

बऱ्याच वेळेस मीडिया रिपोर्टमध्ये चरस, गांजा, अफीम, हेरॉइन या अमली पदार्थांची नावे ऐकायला येतात. मात्र त्यामध्ये नेमका काय फरक असतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

सर्व अमली पदार्थ एकसारखे नसतात.. जाणून घ्या स्मॅक, चरस, अफीम, हेरॉईन, गांजा यातील फरक !
Follow us on

अमली पदार्थांबाबत बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात. पोलिस (police)किंवा नार्कोटिक्स विभागाने (narcotics bureau) अवैधरित्या विकण्यात येणारे चरस, हेरॉईन, अफीम, गांजासारखे अमली पदार्थ जप्त केल्याचा बातम्याही अनेक वेळा ऐकायला येतात. या सर्व पदार्थांना ड्रग्ज (Drugs) किंवा अमली पदार्थ असे म्हटले जाते. मात्र सर्व अमली पदार्थ हे एकसारखे, सेम नसतात. त्या प्रत्येकातील नशेची मात्रा वेगवेगळी असते. आणि त्यांचे सेवन करण्याची पद्धतही वेगळी असते. खरंतर अनेक अमली पदार्थ नैसर्गिक स्वरूपात मिळतात, तर काही अमली पदार्थ तयार केले जातात. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की या सर्व अमली पदार्थांमध्ये नेमका काय फरक आहे, ते कसे वेगळे असतात आणि कसे तयार केले जातात ?

स्मॅक – स्मॅक हा काही नैसर्गिक पदार्थ नाही, तो मशीनद्वार तयार केला जातो. हे अफूपासून बनवल जाते. अफूमपासून अनेक प्रकारचे अमली पदार्थ तयार केले जातात, त्यामध्ये स्मॅकचाही समावेश आहे. स्मॅक तयार करण्यासाठी अफूमध्ये इतर पदार्थांचाही समावेश केला जातो, त्यानंतर अफू तयार होते.

चरस – चरसबाबत बोलायचे झाले तर कॅनेबिस नावाची एक वनस्पती असते आणि त्यापासून रेझिन मिळते. रेझिन हेही त्या वनस्पतीचा एक भाग असतो. रेझिन हा झाडे आणि वनस्पतीमधून निघणारा एक चिकट स्त्रावर असतो. त्यालाच चरस, हशीस आणि हॅश म्हटले जाते.

अफू – अफू म्हणजे नक्की काय हे आता जाणून घेऊया. अफूची वाढ होते आणि त्यातून जे मार्फिन मिळते, त्यातून अनेक अमली पदार्थ बनतात. अफूचे दूध मिळवण्यासाठी त्याच्या कच्च्या फाला एक चीर दिली जाते व ते वाळवले जाते. त्यानंतर त्यातून अफू मिळते.

हेरॉइन – हेरॉइनबद्दल बोलायचे झाले तर ते अफूपासून बनवले जाते आणि ते मानवनिर्मितही असते. हेरॉईनमध्ये मार्फिनही असते, जे वैद्यकीय क्षेत्रात पेनकिलर औषधाच्या स्वरूपात वापरले जाते. अफू आणि ॲसिटिक एकत्र करून हेरॉइन तयार होते. त्याला डाय ॲसिटिलही म्हटले जाते.

गांजा – गांजा हे वनस्पती स्वरूपात उगवते. गांजा कॅनेबिस वनस्पतीच्या फुलापासून तयार केले जाते. आणि त्यानंतर ते वाळवून व जाळून धुराच्या स्वरूपात, त्याचे सेवन केले जाते. त्यापासून भांगही तयार केली जाते.

भांग – भांग म्हणजे काय, हे जाणून घेऊया. या वनस्पतीमध्ये नर व मादी असे प्रकार असतात. नर प्रजातीपासून भांग बनते तर मादी प्रजातीपासून गांजा तयार केला जातो. तसे पहायला गेले तर, भांग, त्या वनस्पतीची पाने आणि बिया दळून तयार केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर फुलांपासून गांजा आणि पानांपासून भांग बनवली जाते.

ब्राऊन शुगर – ब्राऊन शुगर ही सुद्धी अफूपासून बनते. ही पावडर स्वरूपात असते व त्यामध्ये 20 टक्के हेरॉईन असते.