कोणत्या झाडाचं लाकूड सर्वाधिक टिकावू आणि मजबूत? ‘हे’ आहे या प्रश्नाचं उत्तर

| Updated on: Aug 02, 2021 | 6:52 AM

जितकं वस्तूचं लाकूड चांगलं तितकी ती वस्तू टिकाऊ असते. म्हणूनच कोणत्या झाडाचं लाकूड अधिक टिकावू आणि मजबूत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.

1 / 5
घरात दरवाजा, खिडकी, बेड, खुर्ची, टेबल अशा अनेक फर्निचर वस्तू घेताना आपल्याला कोणतं लाकूड चांगलं असा प्रश्न पडतो. कारण जितकं त्या वस्तूचं लाकूड चांगलं तितकी ती वस्तू टिकाऊ असते. म्हणूनच कोणत्या झाडाचं लाकूड अधिक टिकावू आणि मजबूत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.

2 / 5
सर्वात टिकावू लाकूड कोणतं याविषयी अनेक अहवाल आहेत. यातील काही अहवाल शिसम या लाकडाला मजबूत सांगतात. याचा उपयोग विशेष करुन फर्निचरसाठी होतो. गावांमध्ये जुन्या लोकांनी म्हणूनच मोठ्या प्रमाणात शिसमची झाडं लावू ठेवलीत. या लाकडाच्या टिकावूपणामुळेच शिसमची किंमतही खूप असते.

3 / 5
दुसरीकडे अनेक अहवाल देवदार वृक्षाचं लाकूड मजबूत असल्याचं सांगतात. मात्र हे झाड डोंगरी भागात आढळतं. साधारणपणे 3500 ते 12000 फूट उंचीपर्यंत याची वाढ आहे. देवदार झाडाचं लाकूड देखील खूप मजबूत असतं. त्यामुळेच याचाही फर्निचर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. देवदारला वैज्ञानिक भाषेत सिड्रस देवदार (Cedrus Deodara) म्हणतात.

4 / 5
देवदारला हिमाचल प्रदेशात विशेष दर्जा देण्यात आलाय. हे झाड कोणत्याही प्रकारच्या मातीत सहजपणे येतं. त्यामुळेच ते लोकप्रिय आहे. हे झाड 45 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीपर्यंत वाढतं. डोंगराळ भागात या झाडाचं भौगोलिक, सांस्कृतिक आणि भौतिक महत्व आहे.

5 / 5
महोगनीचं लाकूडही मजबूत मानलं जातं. याचा रंग काहिसा लाल, राखाडी असतो. हे लाकूड मोठा काळ टिकतं. याला पाण्यानंही काही नुकसान होत नाही. हे झाड 50 डिग्री सेल्सियसपर्यंतचं तापमान सहन करु शकतं. याला अगदी कमी पाणी असेल तरी चालतं. (Photo Source: Pexels, Al jazeera)