Solar Storm: सूर्य देव कोपलाय! दोन आठवड्यात 35 भयानक स्फोट, 6 वेळा सौर लहरींचा कहर, 2025 असेल सर्वात धोकादायक

| Updated on: Aug 08, 2022 | 10:58 PM

हे सौर वादळ रेडिओ सिग्नल्समध्ये व्यत्यय आणू शकतात. GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो. यामुळे जीपीएस, तसेच मोबईल नेटवर्कवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच पॉवर ग्रीडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ब्लॅकआउट होण्याची शक्यता असते.

Solar Storm: सूर्य देव कोपलाय! दोन आठवड्यात 35 भयानक स्फोट, 6 वेळा सौर लहरींचा कहर, 2025 असेल सर्वात धोकादायक
Follow us on

वॉशिंग्टन : पासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता देण्याचा सूर्य हा मुख्य स्त्रोत आहे. सुर्यामुळेच पृथ्वीतलावर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. यामुळेच सूर्याला सूर्य देव म्हणून संबोधले जातो. सूर्य देव पृथ्वीवर कोपला असल्याची भिती व्यक्त केली जात आहे आहे. तशा प्रकारच्या खगोलीय घडामोडी घडत आहेत. मागील दोन आठवड्यात सूर्यावर 35 भयानक स्फोट झाले आहेत. तर तब्बल सहा वेळा सौर लहरींचा कहर पहायला मिळाला आहे. 2025 वर्ष हे अत्यंत धोकादायक असेल अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर, नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने अंदाज वर्तवला आहे. तसेच नासाने(NASA) देखील सौर वादळांची (Solar storm) भिती व्यक्त केली आहे.

सौर वाऱ्याचा वेगवान प्रवाह पृथ्वीच्या जवळ येतोय

मागील काही वर्षांत सूर्यावर खूप कमी हालचाली दिसल्या आहेत. या हालचालींना सोलार मिनिमम अवस्था असे म्हणतात. आता मात्र सोलार मॅक्सिमम अवस्थेत प्रचंड वेगाने बदल होत आहे. 2025 नंतर या बदलांचा वेग आणखी वाढले असा नासाचा अंदाज आहे. सध्या मोठ्या प्रमामात सौर वादळं निर्माण होत आहेत. सौर वाऱ्याचा वेगवान प्रवाह पृथ्वीच्या जवळ येत आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

सौर वादळ कसे तयार होते

सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या सनस्पॉट्स म्हणजे चमकणाऱ्या ठिपक्यांमधून चुंबकीय उर्जा उत्सर्जित होत असते. त्यांचा सूर्याभोवतालच्या वातावरणात झालेला स्फोट म्हणजेच सौदृर वादळ या स्फोटातून तयार झालेलं वादळ कधी कधी सूर्याचं चुंबकीय क्षेत्र ओलांडून सौरमालिकेत सगळीकडे पसरतं. नासाच्या मते, सौर लहरी ही ऊर्जेचा अचानक स्फोट आहे जो सूर्याच्या ठिपक्यांजवळ चुंबकीय क्षेत्राच्या रेषांमध्ये अडकल्यामुळे उद्भवतो. NASA ने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की 2025 मध्ये जसजसे आपण सोलर मॅक्झिममच्या जवळ जाऊ तसतसे सौर घटनांमध्ये वाढ होईल.

सौर वादळ का येते

हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे, त्यामुळे उष्णता वाढते. ज्याला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 15 ते 18 तास लागतात.

सौर वादळ म्हणजे नेमकं काय?

या वादळामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या ज्वाळा तयार होतात. यातून मोछा किरणोत्सर्गार होतो. कित्येक वेळा सूर्यापासून निघालेले रेडिएशन बऱ्याच वेळा पृथ्वीपर्यंत पोहोचते. मात्र, पृथ्वीच्या गाभ्यातून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार झालेलं असतं; जे आपल्याला या रेडिएशनपासून वाचवतं. सौरवादळाच्या वेळी मात्र रेडिएशन अगदीच जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे हे कवच भेदले जाते.

सौर वादळाचे परिणाम

हे सौर वादळ रेडिओ सिग्नल्समध्ये व्यत्यय आणू शकतात. GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो. यामुळे जीपीएस, तसेच मोबईल नेटवर्कवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच पॉवर ग्रीडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ब्लॅकआउट होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वादळाबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.