हातात ‘बंदूक’ आणि खांद्यावर ‘खाट’ घेऊन जवानांनी, गर्भवतीला पोहचविले रुग्णालयात; लोक म्हणाले…याला म्हणतात रिअल हिरो..!

| Updated on: Apr 21, 2022 | 9:58 PM

नक्षलग्रस्त भाग ‘दंतेवाडा’ तील रेवली गावात जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांनी गरोदर महिलेला खाटेवर उचलून रुग्णालयात नेल्याचा, एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समाजमाध्यमांत या जवानांचे कौतुक होत असून, हेच खरे हिरो असल्याच्या प्रतिक्रीया लोक देत आहेत.

हातात ‘बंदूक’ आणि खांद्यावर ‘खाट’ घेऊन जवानांनी, गर्भवतीला पोहचविले रुग्णालयात; लोक म्हणाले…याला म्हणतात रिअल हिरो..!
हातात ‘बंदूक’ आणि खांद्यावर ‘खाट’ घेऊन जवानांनी, गर्भवतीला पोहचविले रुग्णालयात
Image Credit source: NDTV India
Follow us on

छत्तीसगड : नक्षलग्रस्त भाग छत्तीसगडमध्ये जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांनी मानवतेचा आदर्श घालून दिला आहे. दंतेवाडा येथे शोध मोहिमेदरम्यान (During the search operation), प्रसुती वेदनांनी त्रस्त असलेल्या गर्भवती महिलेला जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) दलाच्या जवानांनी खाटेवर उचलून रुग्णालयात नेले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण तरुणाचे कौतुक करत आहेत. येथे तैनात असलेले सैनिक अनेकदा येथील रहिवाशांना मदत करतात. आता असेच एक प्रकरण दंतेवाडातील रेवली गावात समोर आले आहे. येथे जिल्हा राखीव रक्षक दलाच्या (District Reserve Guard) जवानांनी गरोदर महिलेला खाटेवर उचलून रुग्णालयात नेले.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या दहशतीत जीवन कंठीत असलेल्या गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रोजचेच जगणे असल्याने, किरकोळ अडचणींकडे येथील नागरिकही गांभीर्याने पाहत नाहीत. परंतु, एखाद्या दिवशी, रात्री बेरात्री रुग्णालयात जाण्याची गरज असल्यास, येथील लोकांना जिवावर उदार होऊन, घर ते रुग्णालय अंतर पार करावे लागले. असाच त्या दिवशी, नक्षलवाद्यांनी रेवली गावाचा रस्ता अनेक ठिकाणांहून रोखला होता.

डीआरजी जवानांनी खाटेला स्ट्रेचर बनवले

दरम्यान, गावातील एका गर्भवतीला प्रसुती वेदना सुरू झाल्या. तिच्या पतीने रुग्णवाहिका मागवली असता, नक्षलवाद्यांनी रस्ता खोदला असल्याने रुग्णवाहिकेच्या जवानांनी गावात पोहोचण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे डीआरजी जवानांनी खाटेला स्ट्रेचर बनवले आणि महिलेला खाटेवर सुमारे 3 किमीवर सुरक्षित स्थळी नेले. तिथे डीआरजीचे गस्तीचे वाहन तिला 90 किमी अंतरावर असलेल्या पालनार रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी थांबले होते. जवानांनी केलेल्या या कार्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर फीरत असून, जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटातील अभिनेते नव्हे तर, आपल्या जिवावर उदार होऊन सर्वसामान्यांच्या सेवेत असणारे भारतीय जवान च खरे हिरो असल्याच्या प्रतिक्रीया समाजमाध्यमांत व्यक्त होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, प्रसुत झालेल्या महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.

इतर बातम्या

Prashant Kishor Congress: काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘गांधी’ नकोच, प्रशांत किशोर यांचा सोनिया गांधींना नेमका सल्ला काय?

Boris Johnson India Tour Video: ब्रिटनचे पंतप्रधानही ‘बुलडोजर’च्या प्रेमात, गुजरात दौऱ्यात स्वत: स्टेअरींग केलं चेक