IPS अधिकारी होण्यासाठी काय करावे, किती असतो त्यांना पगार?

| Updated on: Apr 20, 2024 | 5:28 PM

आयपीएस अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. आयपीएस अधिकारी होण्यासाठी यूपीएससी परीक्षा पास करावी लागते. जी कठीण परीक्षा मानली जाते. पण अभ्यासात सातत्य आणि चिकाटी असेल तर तुम्ही देखील ही परीक्षा पास होऊ शकतात. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर किती पगार मिळतो जाणून घ्या.

IPS अधिकारी होण्यासाठी काय करावे, किती असतो त्यांना पगार?
Follow us on

IPS EXAM : यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला आपलं नशीब आजमवत असतात. पण काही मोजक्या लोकांनाच यामध्ये यश मिळते. जिद्द आणि चिकाटी असेल तरच या परीक्षेत उत्तीर्ण होता येतं. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयपीएसची नोकरी मिळते. आयपीएस अधिकाऱ्याचा दर्जा स्पेशल असतो. कोणत्याही जिल्ह्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी किंवा एसपी हा आयपीएस अधिकारी असतो.

आयपीएस अधिकाऱ्यारी जबाबदारी

भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) रुजू होणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी त्याच्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखणे असते. आयपीएस अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी या पदांवर बढती मिळते.

आयपीएस अधिकाऱ्यांना कोणत्या सुविधा मिळतात

आयपीएस अधिकाऱ्याला इतर सुविधा मिळतात. ज्या वेगवेगळ्या वेतन बँडवर अवलंबून असतात. आयपीएस अधिकाऱ्याला घर आणि गाडीची सुविधा दिली जाते, परंतु पदानुसार गाडी आणि घराचा आकार ठरवला जातो. यासोबतच आयपीएस अधिकाऱ्यांना पोस्टनुसार ड्रायव्हर, हाऊस हेल्प आणि सुरक्षा रक्षकही दिले जातात. याशिवाय पोस्टनुसार वैद्यकीय उपचार, फोन आणि वीज बिलासाठीही भत्ता मिळतो.

आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती?

IPS अधिकाऱ्याच्या पगार 7 व्या वेतन आयोगानुसार 56100 रुपये असतो. या मूळ वेतनाव्यतिरिक्त, आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात. आयपीएस अधिकारी पदोन्नतीनंतर डीजीपी पदापर्यंत पोहोचू शकतो आणि डीजीपी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो. डीजीपी झाल्यानंतर एका आयपीएस अधिकाऱ्याला महिन्याला सुमारे २.२५ लाख रुपये पगार मिळतो.

कोणते फायदे मिळतात

एसपी शैक्षणिक रजा घेऊन देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेऊ शकतो. 30 दिवस EL आणि 16 दिवस CL देखील उपलब्ध आहेत. मुलांना शिक्षण देण्यासाठी वार्षिक शिक्षण भत्ता दिला जातो. ते स्वत: आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळवून देऊ शकतात. याशिवाय वर्षातून एकदा प्रवासाची सवलतही मिळते. ते आपल्या कुटुंबासह देशात कुठेही जाऊ शकतात.

आयपीएस अधिकारी कसे व्हावे

आयपीएस अधिकारी होण्यासाठी तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. आयपीएस अधिकाऱ्यांना २ वर्षे २ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.  UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी तीन पायऱ्या असतात.