दरवर्षी 8 दिवस लॉकडाऊन करणार, नगरमधील 105 गावांचा निर्णय, कौतुकास्पद कारण

| Updated on: Jun 06, 2020 | 12:45 PM

नगर तालुक्यातील 105 गावांनी दरवर्षी आठ दिवस लॉकडाऊन (Nagar villages decision every year lockdown) करण्याचा संकल्प केला आहे.

दरवर्षी 8 दिवस लॉकडाऊन करणार, नगरमधील 105 गावांचा निर्णय, कौतुकास्पद कारण
Follow us on

अहमनगर : अहमदनगरधील नगर तालुक्यातील 105 गावांनी दरवर्षी आठ दिवस लॉकडाऊन (Nagar villages decision every year lockdown) करण्याचा संकल्प केला आहे. नुकतीच मोजक्या पाच व्यक्तींमध्ये पार पडलेल्या सभेत हा निर्णय झाला. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केलं जातंय. या निर्णयामागे गावकऱ्यांचा मोठा उद्देश आहे. निसर्गाचं रक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे हा त्यामागचा हेतू आहे. त्यासाठीच दरवर्षी मे महिन्यात या गावांमध्ये 8 दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

नगर तालुक्यातील तब्बल 105 गावच्या शेतकऱ्यांनी शेतीकामाला आठ दिवस बंद ठेऊन निसर्गाला विसावा देण्याचा निर्णय घेतला आहे. “लॉकडाऊनने आम्हाला खूप काही शिकवले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन आहे, मात्र याकाळात मनुष्याचा वावर कमी झाल्याने निसर्गाचा फायदा झाला आहे. माणसाचा निसर्गातील हस्तक्षेप कमी झाल्याने, पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी झाले. गुरे आणि शेतांना थोडा आराम मिळाला, यातून आपणास आणि पर्यावरणास विसाव्याची आरामाची गरज आहे याची जाणीव झाली”, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.

हा ठराव सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. त्याच्याबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दशकांपूर्वी अनुभवयास मिळणारी शांतता आणि निवांतपणा लोकांनी लॉकडाऊनच्या तीन महिन्यात अनुभवला. मागील काही वर्षांमध्ये आपण शहरी जीवनशैलीने प्रभावित होऊन आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचा र्‍हास करत आहोत, आपली जीवनशैली पर्यावरणपूरक आणि त्यास अनुभवी हे लॉकडाऊनने आपणास शिकवले आहे.

“मागील तीन महिन्यात स्वच्छ हवा मिळाली, तसेच धावपळीच्या आणि तणावमुक्त जीवनात आरामाची गरज आहे याची जाणीव झाली. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात आठ दिवस लॉकडाऊनचे पालन केले जाईल. या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, तसेच लोक सामूहिक संवर्धनाची कामे जसे जलसंधारणासाठीचे उपक्रम किंवा इत्यादी कामात सहभागी होतील आणि त्यांची दैनंदिन कामे बाजूला ठेवतील”, असं आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितलं.

वार्षिक लॉकडाऊनचे निश्चितच फायदे होतील, या काळात आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढावा तसेच आपण जीवनाविषयी चिंतन करावे, आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ द्यावा, असा सूर या ठरावनंतर उमटू लागला आहे. त्यामुळे इतर गावे देखील याचे अनुकरन करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Nagar villages decision every year lockdown)