धुळ्यात एकाचवेळी 200 ते 250 मेंढ्यांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

धुळे : धुळ्यामध्ये काल (11 मे) अचानक एकाचवेळी 200 ते 250 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. संध्याकाळी 7 वाजता शेतात चरत असताना अचानक मेंढ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. धुळ्यामधील नारायण ठेलारी या शेतकऱ्याच्या  या मेंढ्या होत्या. धुळ्यामधील शिंदखेडा तालुक्यातील जुनेकोडदे  या ठिकाणी नारायण हरी ठेलारी हे मेंढ्यांना चराई […]

धुळ्यात एकाचवेळी 200 ते 250 मेंढ्यांचा मृत्यू
Follow us on

धुळे : धुळ्यामध्ये काल (11 मे) अचानक एकाचवेळी 200 ते 250 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. संध्याकाळी 7 वाजता शेतात चरत असताना अचानक मेंढ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. धुळ्यामधील नारायण ठेलारी या शेतकऱ्याच्या  या मेंढ्या होत्या.

धुळ्यामधील शिंदखेडा तालुक्यातील जुनेकोडदे  या ठिकाणी नारायण हरी ठेलारी हे मेंढ्यांना चराई करण्यासाठी घेऊन गेले. यावेळी शेतात सर्व मेंढ्या शेतात चराई करत होत्या. मात्र अचानक एक एक करुन सर्व मेंढ्या जमिनीवर कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. एकाचवेळी 200 मेंढ्याचा मृत्यू झाल्याने ठेलारी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळलं आहे. यामुळे सरकाराने ठेलारी कुटुंबाला मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

शासनाने तात्काळ या सर्व गोष्टींची चौकशी करावी. तसंच या परिवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे. मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आधीच दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हैराण आहे. त्यात मेंढपालांवर हे संकट आल्याने शेतकरी ठेलारी यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे.