रिक्षावाल्याच्या फसवणुकीची हद्द, तब्बल 3 हजार पोरी पटवल्या

| Updated on: Sep 04, 2019 | 1:55 PM

रिक्षावाल्याने फेसबुकवरुन (Facebook) फेक अकाऊंटद्वारे तब्बल तीन हजार मुलींची फसवणूक करत त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

रिक्षावाल्याच्या फसवणुकीची हद्द, तब्बल 3 हजार पोरी पटवल्या
Follow us on

लखनऊ : एका रिक्षावाल्याने (Auto rickshaw driver) तब्बल तीन हजार मुलींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडली. येथील रिक्षावाल्याने फेसबुकवरुन (Facebook) फेक अकाऊंटद्वारे तब्बल तीन हजार मुलींची फसवणूक करत त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जावेद असं या आरोपी रिक्षावाल्याचे नाव आहे. पोलिसांनी जावेदला (52) अटक केली असून अधिक चौकशी करत आहे.

जावेदने फेसबुकवर IPS नरुल हसन नावाने एक फेसबुक अकाऊंट बनवले होते. या अकाऊंटद्वारे त्याने हजारो लोकांसोबत मैत्री केली होती. यामध्ये मुलींची संख्या अधिक होती.

फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर जावेद दररोज मुलींसोबत अश्लील चॅटींग करत होता. तसेच त्यातील अनेक मुलींनी लग्न करण्याची इच्छाही दर्शवली होती. मुलींसोबत चाटिंग करताना जावेद त्यांच्याकडे नग्न फोटो मागत होता. काही मुलींनी त्याच्यावर विश्वास ठेवून नग्न फोटोही पाठवले होते, असं पोलिसांनी सांगितले.

जावेदचा फोन तपासला तेव्हा त्यामध्ये तो सध्या 16 मुलींसोबत चॅट करत होता. यात अनेक अश्लील आणि न्यूड फोटोही मागितल्याचे मेसेजही होते. जावेद खरचं आयपीएस अधिकारी आहे का? हे जाणून घेण्यासाठी अनेक मुली व्हिडीओ कॉल करत होत्या. पण तो फोन उचलत नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जावेदच्या या प्रकरणाबद्दल त्याच्या पत्नीला माहित होते. तिने पतीच्या फोनमध्ये अनेक मुलींचे नग्न फोटो पाहिले होते. तिने रागात पतीचा पाच वेळा फोनही फोडला होता. पतीच्या या सवयीमुळे पत्नीही कंटाळली होती. काम सोडून जावेद दिवस-रात्र फक्त मुलींसोबत बोलत असायचा.