सांगलीत नवा विश्व विक्रम, पहिल्या दहा मिनिटात साडेपाच लाख ब्लॉक, तर दुसऱ्यावेळी साडेसहा लाख पंच

| Updated on: Feb 02, 2020 | 3:47 PM

जिल्ह्यातील एकूण 833 कराटेपटूंनी विश्वविक्रम (Karate world record in sangli) केला.

सांगलीत नवा विश्व विक्रम, पहिल्या दहा मिनिटात साडेपाच लाख ब्लॉक, तर दुसऱ्यावेळी साडेसहा लाख पंच
Follow us on

सांगली : जिल्ह्यातील एकूण 833 कराटेपटूंनी विश्वविक्रम (Karate world record in sangli) केला आहे. पहिल्या दहा मिनिटात 5 लाख 58 हजार 110 ब्लॉक आणि दुसऱ्या दहा मिनिटात 6 लाख 58 हजार 17 पंच मारण्यात आले आहेत. रविवारी (2 फेब्रुवारी) हा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया बुकमध्ये नोंदवण्यात आला. कन्नजकू कराटे चॅम्पियन्सतर्फे हा विश्वविक्रम नोंदवण्यात (Karate world record in sangli) आला आहे.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीतील अरवाडे हायस्कुलच्या मैदानावर सकाळी हा उपक्रम संपन्न झाला.

सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यातील 833 कराटेपटूंनी विश्वविक्रमात सहभाग घेतला. पहिल्या दहा मिनिटात 833 खेळाडूनी 5 लाख 58 हजार 110 ब्लॉक मारले, तर दुसऱ्या दहा मिनिटात 6 लाख 58 हजार 17 पंच मारत विक्रम नोंदवला.

या उपक्रमाच्या माध्यमातून 3 वर्ष वयोगट ते 21 वर्ष वयोगटातील तरुण आणि तरुणींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहे. इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी सुहास कारेकर यांच्या हस्ते सहभागी कराटेपटूंना प्रशस्तीपत्र देण्यात आले.