Kangana Ranaut | ‘मुव्ही माफिया गँग घरात लपल्यामुळे मल्याळम चित्रपटाची ‘ऑस्कर’वारी’, कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका!

| Updated on: Nov 26, 2020 | 11:56 AM

‘चित्रपट माफिया टोळी त्यांच्या घरात लपून बसली असल्याने, ज्यूरीला त्यांचे काम करण्याची मुभा मिळाली आहे. खूप चांगले. हे असेच झाले पाहिजे’,असे कंगनाने म्हटले आहे.

Kangana Ranaut | ‘मुव्ही माफिया गँग घरात लपल्यामुळे मल्याळम चित्रपटाची ‘ऑस्कर’वारी’, कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका!
Follow us on

मुंबई : मल्याळम चित्रपट ‘जल्लीकट्टू’ने (Jallikattu) ऑस्कर स्पर्धेत प्रवेश केला आहे. भारताकडून ‘93व्या ऑस्कर पुरस्कार 202’साठी या मल्याळम चित्रपटाला नामांकित केले गेले आहे. ही बातमी व्हायरल होताच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) यावर प्रतिक्रिया दिली. कंगनाने ट्विट करत पुन्हा बॉलिवूडवर टीका केली आहे. ‘चित्रपट माफिया टोळी त्यांच्या घरात लपून बसली असल्याने, ज्यूरीला त्यांचे काम करण्याची मुभा मिळाली आहे. खूप चांगले. हे असेच झाले पाहिजे’,असे कंगनाने म्हटले आहे (Actress Kangana Ranaut slam’s Bollywood after jallikattu nominated for Oscar).

कंगना लिहिते, ‘बॉलिवूड गँग बद्दल जितके वाईट बोलले गेले, त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. भारतीय चित्रपट केवळ या फिल्मी कुटुंबांसाठी मर्यादित नाही. ‘मुव्ही माफिया गँग त्यांच्या घरात लपून बसली आहे. त्यामुळे ज्यूरीला त्यांचे काम करण्याची मुभा मिळाली आहे. खूप चांगले. हे असेच झाले पाहिजे. जल्लीकट्टूच्या टीमचे अभिनंदन.’

27 चित्रपटांमध्ये चुरस

93व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सहभगी होण्यासाठी तब्बल 27 चित्रपटांमध्ये चुरस रंगली होती. या 27 चित्रपटांमधून अखेर ‘जल्लीकट्टू’ची निवड झाली आहे. या स्पर्धेत शुजित सरकारचा ‘गुलाबो सीताबो’, सफदर रेहानाचा ‘चिप्पा’, हंसल मेहतांचा ‘छलांग’, चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’, विधु विनोद चोप्रांचा ‘शिकारा’, अनंत महादेवनचा ‘बिटरस्वीट’, रोहेना गगेराचा ‘इज लव्ह इनफ सर’, गीतू मोहनदासचा ‘मुथोन’, नीला माधव पांडा यांचा  ‘कलिरा अतीता’, अनविता दत्तचा ‘बुलबुल’, हार्दिक मेहताचा ‘कामयाब’ आणि सत्यांनु-देवांशु यांचा ‘चिंटू का बर्थ डे’ या चित्रपटांचा समावेश होता (Actress Kangana Ranaut slam’s Bollywood after jallikattu nominated for Oscar).

केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित चित्रपट

ऑस्करसाठी पाठविलेला ‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील ‘जल्लीकट्टू’ या वादग्रस्त खेळावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते.

चित्रपटाची कथा

वार्के आणि अँटनी नावाची दोन माणसे कत्तल खाना चालवत असतात. या ठिकाणी म्हशींची कत्तल केली जात असते. एका रात्री, एक म्हैस या कत्तल खान्यातून पळून जाते आणि खेड्यात शिरून तेथे धुडगूस घालते. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी गावकरी एका शिकाऱ्याची मदत घेतात. हा शिकारी बंदूक घेऊन गावात पोहोचतो. मात्र, ही गोष्ट अँटनीला अजिबात आवडत नाही. यापुढे काय घडते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

(Actress Kangana Ranaut slam’s Bollywood after jallikattu nominated for Oscar)