Taapsee Pannu | ‘केवळ अभिनेत्याच्या पत्नीला खटकले, म्हणून चित्रपटातून काढले’, तापसी पन्नूचा खळबळजनक दावा!

| Updated on: Nov 18, 2020 | 4:10 PM

अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान तिने आपल्या चित्रपटसृष्टीतील संघर्षावर भाष्य केले.

Taapsee Pannu | ‘केवळ अभिनेत्याच्या पत्नीला खटकले, म्हणून चित्रपटातून काढले’, तापसी पन्नूचा खळबळजनक दावा!
अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या कसदार अभिनयासाठी आणि दमदार व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
Follow us on

मुंबई : बॉलिवूडची ‘पिंक गर्ल’ अर्थात अभिनेत्री तापसी पन्नू (Actress Taapsee Pannu) सध्या चित्रपट वर्तुळात चर्चेत आहे. आगामी चित्रपट ‘रश्मि रॉकेट’मुळे सध्या तापसीची नावाची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तपासीने या चित्रपटातील एका दृश्यादरम्यानचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोतील तिच्या हेअर स्टाईलने तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तापसीकडे चित्रपटांची रांग लागली आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी आपल्याला ‘फ्लॉप’ म्हटले जायचे. एकदा तर केवळ अभिनेत्याच्या पत्नीला खटकले म्हणून चित्रपटातून काढण्यात आले, असा दावा एका मुलाखती दरम्यान तापसी पन्नूने केला आहे (Actress Taapsee Pannu Talks About struggle).

अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान तिने आपल्या चित्रपटसृष्टीतील संघर्षावर (Struggle) भाष्य केले. यावेळी तिने अनेक खळबळजनक खुलासे देखील केले. ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बेबी’, ‘मिशन मंगल’, ‘बदला’ या चित्रपटांमुळे तापसी पन्नू आज यशस्वी अभिनेत्री म्हणून पहिले जाते. तापसीच्या चित्रपट कारकीर्दीला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने तिने आपली संघर्षगाथा मांडली.

दक्षिणात्य चित्रपटांतून सुरुवात

तापसीने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात तमिळ आणि तेलगु चित्रपटांमधून केली होती. आज तापसीकडे मोठमोठे प्रोजेक्टस आहेत. तसेच अनेक बड्या निर्मात्यांना तिने त्यांच्या चित्रपटात काम करावे, अशी इच्छा आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी तिला ‘फ्लॉप’ अभिनेत्री म्हणून हिणवले जायचे.

निर्माते तिला आपल्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी फारसे उत्सुक नसायचे. तिच्या कामावर कोणीच खुश नव्हते याच बाबत एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तापसी सांगते, ‘करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला बरेच वाईट अनुभव आले. मी चांगली दिसत नाही म्हणून, मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.’(Actress Taapsee Pannu Talks About struggle)

‘एकदा तर हिरोच्या पत्नीला मी आवडले नव्हते, म्हणून मला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. तसेच एकदा मी माझ्या चित्रपटाचे डबिंग करत होते. तर हिरोला माझा डायलॉग पसंत पडला नाही म्हणून मला तो बदलण्याची अट घालण्यात आली. परंतु, मी त्याला नकार दिला. तेव्हा निर्मात्यांनी दुसऱ्या डबिंग आर्टिस्टकडून तो बदलून घेतला. असाही एक काळ होता, जेव्हा हिरोचा आधीच चित्रपट चालला नाही म्हणून बजेट कंट्रोलच्या नावाखाली मला मानधनात कपात करायला सांगण्यात आले’, असे तापसी म्हणाली.

तापसीकडे चित्रपटांची रीघ

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, काही दिवसांपूर्वीच ती ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर आता ती ‘शाबाश मिठू’मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक असणार आहे. याशिवाय ‘हसीन दिलरुबा’हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर हे असे कलाकार दिसणार आहेत. ‘लुप लपेटा’, ‘रश्मि रॅकेट’ या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असून, ‘रश्मि रॅकेट’चा फर्स्ट लुकही समोर आला आहे.

(Actress Taapsee Pannu Talks About struggle)