काश्मीरमध्ये पती शहीद, बातमी समजातच पत्नीची आत्महत्या

| Updated on: Jan 02, 2020 | 10:10 PM

काश्मीर खोऱ्यात शत्रूंशी दोन हात करत एक भारतीय जवान शहीद (Indian soldier wife suicide zharkhan) झाला.

काश्मीरमध्ये पती शहीद, बातमी समजातच पत्नीची आत्महत्या
Follow us on

रांची : काश्मीर खोऱ्यात शत्रूंशी दोन हात करत एक भारतीय जवान शहीद (Indian soldier wife suicide zharkhand) झाला. मात्र त्याच्या कुटुंबात मृत्यूची बातमी समजताच पत्नीला धक्का बसला. त्यामुळे पत्नीनेही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. ही घटना झारखंडमधील चन्नो या गावत घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली (Indian soldier wife suicide zharkhand) आहे. बजरंग भगत असं शहीद जवानाचं नाव आहे.

शहीद जवान बजरंग भगत (29) हे काश्मीर येथे तैनात होते. 30 डिसेंबर 2019 रोजी शत्रूंशी दोन हात करत असताना ते शहीद झाले. त्यांचे पार्थिव नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला त्यांच्या गावी आणले. शहीद जवानाची पत्नी मनीता उरांवला पतीच्या मृत्यूने धक्का बसला होता. त्यामुळे तिनेही विहिरीत उडी मारत आत्महत्या केली.

“रांची येथून जवळपास 40 किमी अंतरावर चन्नो गावात ही घटना घडली. पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच पत्नीला धक्का बसला होता. त्यामुळे तिनेही आत्महत्या केली. पत्नीचे शरीर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन वर्षापूर्वी बजरंग आणि मनीताचे लग्न झाले होते. त्या दोघांमध्ये कधीच कोणत्या गोष्टीवरुन भांडण नव्हते. मनीताची नणंद मुल होत नसल्यामुळे सतत टोमणे मारत होती. पतिच्या मृत्यूनंतर ती स्वत:ला एकटी समजू लागली. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असं गावकऱ्यांनी म्हटले.