देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर शेल्टर होमसाठी अक्षयकुमार कडून दीड कोटी दान

| Updated on: Mar 02, 2020 | 8:46 AM

तामिळनाडूमधील चेन्नई शहरात पहिले ट्रान्सजेंडर शेल्टर होम तयार केले जात (Akshaykumar donate money for transgender shelter home) आहे.

देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर शेल्टर होमसाठी अक्षयकुमार कडून दीड कोटी दान
Follow us on

चेन्नई : तामिळनाडूमधील चेन्नई शहरात पहिले ट्रान्सजेंडर शेल्टर होम तयार केले जात (Akshaykumar donate money for transgender shelter home) आहे. या शेल्टर होमला तयार करण्यासाठी ‘लक्ष्मी बम’ चित्रपटाचे अभिनेते अक्षय कुमार आणि दिग्दर्शक राघव लॉरेन्सने यांनी पुढाकार घेतल आहे. तसेच अक्षयने या शेल्टर होमसाठी दीड कोटी रुपयेही (Akshaykumar donate money for transgender shelter home) दान केले आहेत.

दिग्दर्शक राघव यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यासोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडर्ससोबत दिसत आहे.

“हॅले दोस्तो आणि फॅन, मी तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे. अक्षय कुमारने भारतातील पहिले ट्रान्सजेंडर होम तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये दान केले आहेत”, असं या पोस्टमध्ये राघव यांनी सांगितले.

“सर्वांना माहित आहे लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट शिक्षा, लहान मुलांसाठी घरं, मेडिकल आणि फिजिकली एबल्ड डांसर्ससाठी अनेक प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करते. आमच्या ट्रस्टला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही या 15 वर्षात ट्रान्सजेंडर्ससाठी एक नवा प्रस्ताव मांडत आहे. त्यांच्यासाठी लवकरच एक शेल्टर होम तयार करत आहे. आमच्या ट्रस्टने जमीन दिली आहे आणि आम्ही तिथे बिल्डिंग उभी करण्यासाठी पैसा जमवत आहे”, असंही राघव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राघव म्हणाले, “लक्ष्मी बमच्या शुटिंग दरम्यान अक्षय ट्रस्टचे प्रोजेक्ट आणि ट्रान्सजेंडर यांच्या घराबद्दल ऐकत होता. या प्रोजेक्टबद्दल एकल्यानंतर तातडीने अक्षयने त्यांच्या घरासाठी दीड कोटी रुपये दान करणार असल्याचे मला सांगितले. जे कुणी मदतीसाठी पुढे येतात त्यांना मी देवासारखा मानतो. यासाठी अक्षय कुमार माझ्यासाठी देव आहेत. मी या प्रोजेक्टसाठी त्यांनी साथ दिल्यामुळे त्यांचे आभार मानतो.”

“सर्व ट्रान्सजेंडर्सकडून मी अक्षय सर यांचे आभार मानतो. आम्ही लवकरच भूमीपूजनाच्या तारखेची घोषणा करणार आहे. मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे”, असंही रावघ यांनी म्हटले.