‘व्हॅलेनटाईन डे’ पूर्वी एसपी कॉलेजचा मोठा निर्णय, रोझ डे, चॉकलेट डेवर बंदी

| Updated on: Jan 17, 2020 | 4:54 PM

डिसेंबर महिना सुरु झाला की महाराष्ट्रातील अनेक कॉलेजमध्ये डिसेंबर ते जानेवारी दरम्यान वेगवेगळे डेज् साजरे (sp college days ban) केले जातात.

व्हॅलेनटाईन डे पूर्वी एसपी कॉलेजचा मोठा निर्णय, रोझ डे, चॉकलेट डेवर बंदी
Follow us on

पुणे : डिसेंबर महिना सुरु झाला की महाराष्ट्रातील अनेक कॉलेजमध्ये डिसेंबर ते जानेवारी दरम्यान वेगवेगळे डेज् साजरे (sp college days ban) केले जातात. पुण्यातील प्रसिद्ध एसपी कॉलेजमध्येही (सर परशुरामभाऊ कॉलेज) दरवर्षी मोठ्या उत्साहात डेज् साजरे केले जातात. पण यंदा एसपी कॉलेमधील प्रशासनाने डेज् साजरे (sp college days ban) करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

या वर्षीही एसपी कॉलेजमध्ये 16 ते 26 जानेवारी दरम्यान रोझ डे, चॉकलेट डे, फ्रेण्डशिप डेसह इतर डेज् साजरे केले जाणार होते. पण कॉलेज प्रशासनाने पत्रक काढत डेज् साजरे न करण्याची नोटीस विद्यार्थ्यांना दिली आहे. डेज् साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कॉलेज प्रशासनाने डेज् साजरे करण्यावर बंदी घातली आहे.

कॉलेजच्या पंटागणात कोणताही डेज् विद्यार्थांनी साजरा करु नये. जर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं विद्यार्थ्यांनी आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

“कॉलेज प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर कॉलेजच्या मुख्यधापकांनी पुन्हा विचार करावा. डेज् च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कला, कौशल्य सादर करण्याची संधी मिळते. पण यावर बंदी घातल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे”, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे.