International Tiger Day 2019 : देशात वाघांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्रात 250 पेक्षा अधिक वाघ

| Updated on: Jul 29, 2019 | 1:14 PM

जागतिक व्याघ्रदिनी आज (29 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूशखबर दिली आहे. देशातील वाघांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती मोदींनी दिली आहे.

International Tiger Day 2019 : देशात वाघांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्रात 250 पेक्षा अधिक वाघ
Follow us on

नवी दिल्ली : जागतिक व्याघ्रदिनी आज (29 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूशखबर दिली आहे. देशातील वाघांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. देशात आता एकूण 2 हजार 967 वाघ आहेत. यापूर्वी 2014 च्या अहवालानुसार देशात 1706 वाघ होते.

जगात भारत वाघांसाठी सर्वाधिक सुरक्षित ठिकाण आहे. तसेच तामिळनाडूमधील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2006 मध्ये 103, 2010 मध्ये 169, 2014 मध्ये 190 आणि 2019 मध्ये 250 पेक्षा अधिक वाघांची संख्या महाराष्ट्रात झाली आहे.

मध्य प्रदेशने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक मिळवला आहे. मध्य प्रदेशात देशातील सर्वाधिक 526 वाघ आहेत.तर दुसऱ्या क्रमांकावर 524 वाघांसह कर्नाटक आहे. तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड आहे. उत्तराखंडमध्ये 442 वाघ आहेत.

‘एक था टायगर’पासून सुरु झालेला प्रवास ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास इथेच थांबता कामा नये अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.