परिवहन मंत्री दिवाकर रावतेंकडून आणखी एक खुशखबर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि प्रवाशांना एकामागोमाग एक खुशखबर देणाऱ्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिल 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील एसटी महामंडळाच्या 13 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. साधारणपणे 240 […]

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंकडून आणखी एक खुशखबर
Follow us on

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि प्रवाशांना एकामागोमाग एक खुशखबर देणाऱ्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिल 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

राज्यातील एसटी महामंडळाच्या 13 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. साधारणपणे 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येईल. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. वाचाएसटी महामंडळात मेगाभरती, मराठा आरक्षणाचीही अंमलबजावणी

रावते यांनी जून 2018 मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली होती. या वेतनवाढीचा लाभ 1 एप्रिल 2016 पासून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. एप्रिल 2016 ते जून 2018 या दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आाला. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही फरकाची रक्कम हप्त्यांमध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना रावते यांनी दिल्या. वाचाएसटीच्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

जून 2016 नंतर आतापर्यंत महामंडळाचे सुमारे 13 हजार कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यांना अंदाजे 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उर्वरित फरकाची रक्कम सेवानिवृत्तीनंतर एकरकमी देण्यात येणार आहे.