पोलीस मुख्यालयात API चा गळफास, पोलीस दलात खळबळ

| Updated on: Aug 17, 2019 | 4:21 PM

पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) (Prashant Kanerkar) यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं.

पोलीस मुख्यालयात API चा गळफास, पोलीस दलात खळबळ
Follow us on

रायगड : पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) (Prashant Kanerkar) यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. प्रशांत करणेरकर यांची तीन महिन्यांपूर्वीच अलिबाग इथे नियुक्ती झाली होती. त्यांनी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गळफास घेतल्याने जिल्हा पोलीस दल हादरुन गेलं. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून अलिबागला रुजू झाले होते. अलिबाग इथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर ते रजेवर गेले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. मात्र 16 ऑगस्टला रात्री आठ वाजता ते पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गेले आणि त्यांनी गळफास घेतला.

प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली हे अस्पष्ट आहे.