नोटा घेऊन निघालेल्या ट्रकचं दार मध्येच उघडलं, हायवेवर पडलेल्या नोट गोळा करण्यासाठी झुंबड

| Updated on: Jul 11, 2019 | 11:26 AM

रस्त्यावरच्या नोटा पाहून अनेकांनी गाड्या थांबवून, त्या गोळा करुन खिशात भरण्यास सुरुवात केली. “एखाद्या सिनेमाला शोभावं असं दृश्य दिसत होतं. लोक गाड्या थांबवून पैसे गोळा करत होते”, असं तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितलं.

नोटा घेऊन निघालेल्या ट्रकचं दार मध्येच उघडलं, हायवेवर पडलेल्या नोट गोळा करण्यासाठी झुंबड
Follow us on

अटलांटा : अमेरिकेतील जॉर्जियाजवळच्या अटलांटामध्ये मंगळवारी रस्त्यावर नोटांचा खच पाहायला मिळाला. पैसे घेऊन निघालेल्या ट्रकचा दरवाजा मध्येच उघडल्याने रस्त्यावर नोटाच नोटा दिसत होत्या. रस्त्यावरच्या नोटा पाहून अनेकांनी गाड्या थांबवून, त्या गोळा करुन खिशात भरल्या. “एखाद्या सिनेमाला शोभावं असं दृश्य दिसत होतं. लोक गाड्या थांबवून पैसे गोळा करत होते”, असं तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितलं.

चालत्या ट्रकमधून खऱ्याखुऱ्या चलनी नोटा हवेत उडत होत्या, हे अनेकांनी पहिल्यांदाच पाहिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 1 लाख 75 हजार डॉलर म्हणजेच जवळपास सव्वा कोटीच्या नोटा हवेत उडाल्या. त्या नोटा सापडल्याच नाहीत.

याबाबत तक्रारदाराने पोलिसांना माहिती देऊन, जवळपास 15 गाड्या रस्त्यावर थांबल्याचं सांगितलं. हे सर्वजण ट्रकमधून हवेत उडालेल्या नोटा गोळत करत होते. पोलीस अधिकारी आणि ट्रकमधील कर्मचाऱ्यांनी अनेक नोटा गोळा केल्या. पण बहुसंख्य नोटा गायब आहेत, त्यांची माहितीच अद्याप मिळालेली नाही.

जे लोक नोटा गोळा करुन घरी परतले, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. ज्यांच्याकडे नोटा सापडतील त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.