…तर भाजपमध्ये प्रवेश करेन : बच्चू कडू

| Updated on: Oct 04, 2020 | 7:16 PM

मोदीजी जसे 56 इंच छाती छाती असल्याचे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी या बिलात केवळ दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथे बोलताना सांगतिले. (Bacchu Kadu comment on Agriculture Acts)

...तर भाजपमध्ये प्रवेश करेन : बच्चू कडू
Follow us on

अमरावती: केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयके मंजूर करुन घेत त्याचे कायद्यांमध्ये रुपांतर केले. कृषी कायद्यांबद्दल  लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मोदीजी जसे 56 इंच छाती छाती असल्याचे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी या बिलात केवळ दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथे बोलताना सांगतिले. (Bacchu Kadu comment on Agriculture Acts)

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना 50 टक्के नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिले होते. 50 टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात मिळालेला नाही. कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला 50 टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानूसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करु, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारने कृषी विधेयकांना पाठिंबा दिला तर राज्यसभेत सभात्याग केला याविषयी बोलताना बच्चू कडूंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारने दोन वाक्यांचा समावेश केल्यास हे कृषी विषयक कायदे जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत, असे बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर कृषी विभाग झोपल्याची टीका करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता.पेरणी केल्यानंतर सोयाबीन उगवले नव्हते यावरुन कडू यांनी महाबीजवर देखील आरोप केले होते.

नववी ते बारावी शाळा दिवाळीनंतर सुरू

दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकारने अनलॉक 5 बद्दल मार्गदर्शक सूचना जाहीर करताना 31 ऑक्टोबर पर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

संबंधित बातम्या :

Bacchu Kadu | नववी ते बारावीपर्यतची शाळा दिवाळीनंतर, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंची माहिती

Bacchu Kadu |बच्चू कडूंसाठी चिमुकल्याची प्रार्थना, चिमुकल्याच्या प्रार्थनेनं बच्चू कडूही गहिवरले

(Bacchu Kadu comment on Agriculture Acts)