धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, परळीत व्यापाऱ्याला मारहाण

| Updated on: Feb 18, 2020 | 2:14 PM

परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Beed Parli Rada) यांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली.

धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, परळीत व्यापाऱ्याला मारहाण
Follow us on

बीड : परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Beed Parli Rada) यांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.(Beed Parli Rada)

परळीतील टॉवर चौक परिसरात धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मारहाणीचा सर्व प्रकार परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुण्याचे व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि त्यांच्या साथीदारांकडून मारहाण करण्यात आली आहे.

हा सर्व प्रकार प्रॉपर्टीच्या वादातून झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या गणेश कराडसह चार जणांवर संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सर्व आरोपी पसार आहेत.