VIDEO : रकुलप्रीत सिंह भिक मागणाऱ्या मुलांच्या कचाट्यात

| Updated on: Jul 06, 2019 | 8:42 AM

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रकुलप्रीत सिंह भिक मागणाऱ्या लहान मुलांच्या एका ग्रुपमध्ये अडकली आहे.

VIDEO : रकुलप्रीत सिंह भिक मागणाऱ्या मुलांच्या कचाट्यात
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रकुलप्रीत सिंह भिक मागणाऱ्या लहान मुलांच्या एका ग्रुपमध्ये अडकली आहे. यामुळे तिचा चांगलाच गोंधळ उडालेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये लहान मुलं रकुलप्रीतकडे जेवण आणि पैसे मागत आहेत.

व्हिडीओमध्ये रकुलप्रीत सिंह या लहान मुलांच्यामध्ये फसलेली आहे. यामधून निघण्यासाठी रकुलप्रीत सिंह प्रयत्न करत आहे. पण लहान मुलं जबरदस्ती तिला चिकटत असून पैशांची मागणी करत आहेत. अनेक प्रयत्न केल्यानंतर रकुलप्रीतला आपल्या गाडी जवळ पोहचता येते. गाडीत बसून रकुलप्रीत निघून जाते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. पण यामध्ये अनेकजण अभिनेत्रीच्या बाजूने बोलत आहेत.

रकुलप्रीत सिंह नुकतेच बॉलिवूडमधील ‘दे दे प्यार दे’ चित्रपटात दिसली. या चित्रपटात रकुल शिवाय अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री तब्बू प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटात रकुलप्रीत सिंहचा अभिनय आणि तिचा डान्सही सर्वांना आवडला.

‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या यशानंतर रकुलप्रीत आता मिलाप झवेरी यांच्या ‘मरजावा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रकुलप्रीत शिवाय अभिनेता रितेश देशमुख, तारा सुतारिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत आहे.